पॅंथर स्टाईल पॅंथर दणका...| येवले नगर परिषदेला निवेदनाद्वारे इशारा...

येवला महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवला( मुक्त भूमी )येथे महामानवाच्या पुतळ्याची दुरवस्था पाहायला मिळते.

पॅंथर स्टाईल पॅंथर दणका...|  येवले नगर परिषदेला निवेदनाद्वारे इशारा...
Warning to Yeola Municipal Council through a statement ...
पॅंथर स्टाईल पॅंथर दणका...|  येवले नगर परिषदेला निवेदनाद्वारे इशारा...

पॅंथर स्टाईल पॅंथर दणका...

येवले नगर परिषदेला निवेदनाद्वारे इशारा...

येवला महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवला( मुक्त भूमी )येथे महामानवाच्या पुतळ्याची दुरवस्था पाहायला मिळते. आंबेडकरी पक्ष संघटना समाजाच्या वतीने अनेक वर्षापासून अनेक निवेदने या संदर्भात दिलेली असून प्रशासन येथील मुर्दाड पडलेले प्रशासनास जाग येत नसून याबद्दल आंबेडकरी जनते मध्ये तीव्र संतापाची लाट असून बाबासाहेबांचा पुतळा समोरील लागणाऱ्या पाणीपुरीच्या गाड्या' टू व्हिलर गाड्या समोरील इतर अतिक्रमण तसेच पुतळा समोरील पेव्हर ब्लॉक  बसवण्यात यावे तसेच पुतळा आठ दिवसाच्या आत या ठिकाणी त्वरित सुशोभित करण्यात यावा अन्यथा पॅंथर स्टाईल पॅंथर दणक्याने पुढील कार्यक्रम हाती घेण्यात येतील असा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेना नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रशांत  पडवळ'राजु गायकवाड़, आकाश पडवळ ता. अध्यक्ष करण संसारे 'ता. संघटक प्रवीण गरुड 'ता. उपाध्यक्ष गौरव संसारे 'ता. युवा अध्यक्ष तेजस ठोंबरे' संपर्कप्रमुख साई भालेराव' युवा  ता.ध्यक्ष प्रदीप पगारे' शहराध्यक्ष .हर्षल बाविस्कर शहरउपाध्यक्ष .तुषार गुजांलविशाल पाटील  युवा उपअध्यक्ष दर्शन संसारे  आकाश कोपरे , यांनी दिला आहे.

येवला 

प्रतिनिधी - शशिकांत जगताप

_________