पत्रीपुलाच्या कामाचा इव्हेंट केला नसता तर पुलाचे काम वेळेत झाले असते - मनसे आमदार राजू पाटील

पत्रीपुलाच्या कामाचा इव्हेंट केला नसता तर पुलाचे काम वेळेत झाले असते  अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

पत्रीपुलाच्या कामाचा इव्हेंट केला नसता तर पुलाचे काम वेळेत झाले असते - मनसे आमदार राजू पाटील
If the work of Patripula had not been done, the work of the bridge would have been done on time - Munse MLA Raju Patil
पत्रीपुलाच्या कामाचा इव्हेंट केला नसता तर पुलाचे काम वेळेत झाले असते - मनसे आमदार राजू पाटील
पत्रीपुलाच्या कामाचा इव्हेंट केला नसता तर पुलाचे काम वेळेत झाले असते - मनसे आमदार राजू पाटील

पत्रीपुलाच्या कामाचा इव्हेंट केला नसता तर पुलाचे काम वेळेत झाले असते - मनसे आमदार राजू पाटील

कल्याण : पत्रीपुलाच्या कामाचा इव्हेंट केला नसता तर पुलाचे काम वेळेत झाले असते  अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

कल्याणच्या बहूचर्चित पत्रीपुलाच्या ७०० टन वजन ७६मीटर लांब, ११मीटर उंच गर्डर लाँचिंगचे काम  रविवारी ९० टक्के पूर्ण झाले. रविवारी सकाळी दादर स्टेशनवर उद्यान एक्स्प्रेसचे इंजिन फेल झाल्याने पत्रीपुलाच्या मेगाब्लॉकला अर्धा तास उशिराने सुरुवात झाली. उर्वरित १८ मीटर गर्डरच्या लॉंचिंग साठी रेल्वेकडे २ तासाचा मेगाब्लॉकची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे.  

आमदार पाटील यांनी पत्रिपुलाचा गर्डर सरकवण्यासाठी रेल्वे ने मेगाब्लॉक दिला होता मात्र या दोन दिवसांच्या मेगाब्लॉकच्या काळात पहिल्याच दिवशी जर त्यांनी इव्हेंटचा कार्यक्रम केला नसता, प्रसिद्धी करण्यात वेळ वाया घालवला नसता तर कदाचित आज हे काम झालं असतं, मात्र काम न उरकता या कामाचा इव्हेंट मांडला त्यामुळे आजचे काम रखडल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________