पत्रीपुलाचे काम आमच्यासाठी आव्हानात्मक – ऋषी अग्रवाल
आज पहिल्या टप्प्यातील काम झाले असून रविवारी दुसऱ्या टप्प्यातील काम देखील वेळेत पूर्ण होणार आहे.
पत्रीपुलाचे काम आमच्यासाठी आव्हानात्मक – ऋषी अग्रवाल
कल्याण : आज पहिल्या टप्प्यातील काम झाले असून रविवारी दुसऱ्या टप्प्यातील काम देखील वेळेत पूर्ण होणार आहे. हा गर्डर खूप वजनदार कठीण होता. हा गर्डर बनविण्यासाठी महिने लागतात मात्र हैद्राबाद येथील ऋषी अग्रवाल यांनी हा गर्डर केवळ २ महिन्यात पूर्ण केला असून डिसेंबर अखेरपर्यंत या पुलावरून वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती दीपक मंगल यांनी दिली. तर हा गर्डर बनविणे हे आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. वेळेची देखील कमतरता होती.
लॉकडाऊन, पाउस आदी समस्यांमधून देखील आम्ही हे गर्डर हैद्राबाद मधून याठिकाणी आणून आज हे गर्डर लाँचिंगचे काम केले असल्याची माहिती ऋषी अग्रवाल यांनी दिली. यावेळी रिषभ मंगल आणि अशोक कुमार हे त्यांचे सहकारी उपस्थित होते.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
___________