वाशिंद येथील दहागांव देसलेपाडा रस्त्याचे काम निकृष्ट,दोन ते तीन दिवसात रस्त्याला पडल्या भेगा...| वाशिंद दहागाव येथील ग्रामस्थांनी केली गुणनियंत्रण पथकाद्वारे रस्त्याच्या चाचणीची मागणी...
शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात दरवर्षी लहान मोठे रस्ते तयार होत असतात.चांगल्या दर्जाचे रस्ते व्हावेत म्हणून येथील जनतेकडून सरकारकडे वारंवार मागणी होत असते. त्यानुसार सरकारही दरवर्षी विविध रस्त्यावर कोट्यावढी रुपये खर्च करते.
वाशिंद येथील दहागांव देसलेपाडा रस्त्याचे काम निकृष्ट,दोन ते तीन दिवसात रस्त्याला पडल्या भेगा...
वाशिंद दहागाव येथील ग्रामस्थांनी केली गुणनियंत्रण पथकाद्वारे रस्त्याच्या चाचणीची मागणी...
शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात दरवर्षी लहान मोठे रस्ते तयार होत असतात.चांगल्या दर्जाचे रस्ते व्हावेत म्हणून येथील जनतेकडून सरकारकडे वारंवार मागणी होत असते. त्यानुसार सरकारही दरवर्षी विविध रस्त्यावर कोट्यावढी रुपये खर्च करते. परंतु याकामी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांमुळे तयार झालेले रस्ते वर्ष - दोनवर्षे ही टिकत नसल्याची अनेक उधाहरणे आहेत.शहापूर तालुक्यातील वाशिंद येथील दहागांव - देसले पाडा येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
दहागांव येथील ग्रामस्थांच्या सांगण्या प्रमाणे वाशिंद ते कांबारा रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या मध्ये दहागांव देसले पाडा ते हनुमान मंदिर येथे सुरु असलेले काँकरीट रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दि 4 डिसेंबर 2020 रोजी केली. तक्रारीत त्यांच्या म्हण्याप्रमाणे दहागांव देसले निवांस ते हनुमान मंदिर पर्यंत काँकरीट रस्त्याचे काम सुरु आहे. पण या रस्त्याच्या बांधकामाला अवघ्या 2 ते 3 दिवसातच तडे व भेगा पडल्या आहेत. तसेच रस्त्याच्या मधोमत रस्ता दुभंगुन फाटला आहे. रस्त्याच्या या बांधकामाला बांधकाम विभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करीत असून कंत्राटदार एजन्सीशी आर्थिक सगनमत करून निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवत असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे सुरु आलेल्या काँकरीट रस्त्याचे काम तातडीने थांबवून गुण नियंत्रण पथकाद्वारे चाचणी करावी अशी मागणी सुद्धा या तक्रारीत केली आहे.
शहापूर
प्रतिनिधी - शेखर पवार
___________