भ्रष्ट कारभाराने ग्रासलेल्या न. प. प्रशासनाला जागी करण्यासाठी महिलांचा हंडा बजाव मोर्चा...| शिवसंग्राम च्या हंडा बजाव मोर्चास नागरिकांनी सहभागी व्हावे :- प्रशांत डोरले.

परिषदेने मागील 35 वर्षापासून क्षीरसागर घराणेंंच्या ताब्यात आहे. एवढ्या वर्षांमध्ये बीड शहराचा विकासात्मक चेहरा-मोहरा बदलण्याचे काम त्यांनी करणे आवश्यक होते.

भ्रष्ट कारभाराने ग्रासलेल्या न. प. प्रशासनाला जागी करण्यासाठी महिलांचा हंडा बजाव मोर्चा...| शिवसंग्राम च्या हंडा बजाव मोर्चास नागरिकांनी सहभागी व्हावे :- प्रशांत डोरले.
Not plagued by corrupt governance. W. Women's Handa Bajav Morcha to wake up the administration ... | Citizens should participate in Shiv Sangram's Handa Bajav Morcha: - Prashant Dorle.

भ्रष्ट कारभाराने ग्रासलेल्या न. प. प्रशासनाला जागी करण्यासाठी महिलांचा हंडा बजाव मोर्चा...

शिवसंग्राम च्या हंडा बजाव मोर्चास नागरिकांनी सहभागी व्हावे :- प्रशांत डोरले.

परिषदेने मागील 35 वर्षापासून क्षीरसागर घराणेंंच्या ताब्यात आहे. एवढ्या वर्षांमध्ये बीड शहराचा विकासात्मक चेहरा-मोहरा बदलण्याचे काम त्यांनी करणे आवश्यक होते. राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडून प्रत्येक वर्षी शेकडो कोटी रुपये विकासाच्या  नावाखाली बीड शहरासाठी येत असतात. परंतु क्षीरसागर यांनी विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे कुरण करून बीड शहराचा विकास करण्याऐवजी बीड शहराला भकास करण्याचे काम सर्वच क्षीरसागरांनी मिळून केले असून अनेक नागरिकांना घरकुलापासून वंचित ठेवलेले आहे. अशा भ्रष्टाचारी न.प.विरोधात शिवसंग्रामने आवाज उठवला आहे. दि. 28 डिसेंबरला होणार्‍या हंडा बजाओ मोर्चात सर्व नागरिकांसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसंग्रामचे युवक नेते प्रशांत डोरले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.

पाणीपुरवठा करण्यासाठी, रस्ते चांगले करण्यासाठी, भूमिगत गटात योजनेसाठी स्वच्छतेसाठी घरकुलांसाठी शेकडो कोटीच्या योजना आलेल्या आहे. परंतु क्षीरसागरांच्या घरातील भांडणामुळे आणि भ्रष्टाचाराच्या पैशाच्या वाटणीमुळे सदरील कामे वर्षानुवर्षे रखडलेले पाहायला मिळतात. आणि त्याचा त्रास बीडवासियांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. बीड शहराला अभिमान वाटावा अशा पद्धतीचे काम या सर्व क्षीरसागरांनी मिळून काहीही केलेले नाही. त्यामुळे दिवसेदिवस बीडवासियांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. म्हणून, शिवसंग्राम ने वेळोवेळी आ.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीडवासियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे.आणि यापुढेही करत राहू, म्हणून शिवसंग्राम च्या माध्यमातून वेळोवेळी रस्त्याचे काम लवकर सुरू व्हावे म्हणून आंदोलन केले.  उपोषणे केले स्वच्छता मोहीम हातामध्ये घेतल्या, गटारी साफ केली, नदी साफ केली, महापुरुषांच्या स्मारकांची गांधीगिरी करत स्वच्छता केली, असे कार्यक्रम सातत्याने शिवसंग्राम राबवत आहे. आज सुद्धा आणि पावसाळा संपल्यावर आता मुबलक पाणी असताना पण बीडवासियांना कुठे 15 दिवसांनी तर कुठे 10 दिवसांनी नगरपालिकेकडून पाणी मिळत आहे आता मुबलक पाणी असताना जर ही अवस्था आहे तर उन्हाळ्यात काय अवस्था बीडकरांची होईल याचा विचार न केलेला बरा म्हणून पाणीप्रश्न बरोबरच अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर शिवसंग्राम नी येत्या सोमवारी, 28 डिसेंबर 2020 स. 11:00 वा.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नगरपालिके वर हंडा बजाओ मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला  आहे या आंदोलना मध्ये सर्व बीडवाशीयांनी तसेच नगर पालिकेच्या विविध योजना पासून वंचित राहिलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व क्षीरसागरांच्या भ्रष्टाचारी आणि मनमानी कारभाराला आळा घालावा असे आव्हान शिवसंग्रामचे युवा नेते प्रशांत डोरले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

___________