स्व. खा. केशरकाकुंनीच नगराध्यक्ष डाॅ.भारतभुषण यांना सद्बुद्धी द्यावी, महिलांना दुय्यम स्थान नको :-  डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,शेख युनुस च-हाटकर 

बीडचे नगराध्यक्ष डाॅ.भारतभुषण क्षीरसागर व मुख्याधिकारी डाॅ.उत्कर्ष गुट्टे यांना विभागीय आयुक्तांनी निर्देश देऊन सुद्धा नगर रोड वरील शासकीय कार्यालयासमोर केवळ पुरूषांसाठीच स्वच्छतागृह बांधण्यात आली असून महिलांना दुय्यम स्थान देत त्यांची कुचंबना चालुच आहे.

स्व. खा. केशरकाकुंनीच नगराध्यक्ष डाॅ.भारतभुषण यांना सद्बुद्धी द्यावी, महिलांना दुय्यम स्थान नको :-  डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,शेख युनुस च-हाटकर 
Late. Eat. Kesharkakunich should give sanity to the mayor Dr. Bharatbhushan, women do not want a secondary place: - Dr. Ganesh Dhawale Limbaganeshkar, Sheikh Yunus Cha-Hatkar
स्व. खा. केशरकाकुंनीच नगराध्यक्ष डाॅ.भारतभुषण यांना सद्बुद्धी द्यावी, महिलांना दुय्यम स्थान नको :-  डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,शेख युनुस च-हाटकर 
स्व. खा. केशरकाकुंनीच नगराध्यक्ष डाॅ.भारतभुषण यांना सद्बुद्धी द्यावी, महिलांना दुय्यम स्थान नको :-  डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,शेख युनुस च-हाटकर 
स्व. खा. केशरकाकुंनीच नगराध्यक्ष डाॅ.भारतभुषण यांना सद्बुद्धी द्यावी, महिलांना दुय्यम स्थान नको :-  डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,शेख युनुस च-हाटकर 

स्व. खा. केशरकाकुंनीच नगराध्यक्ष डाॅ.भारतभुषण यांना सद्बुद्धी द्यावी, महिलांना दुय्यम स्थान नको :-  डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,शेख युनुस च-हाटकर 

बीडचे नगराध्यक्ष डाॅ.भारतभुषण क्षीरसागर व मुख्याधिकारी डाॅ.उत्कर्ष गुट्टे यांना विभागीय आयुक्तांनी निर्देश देऊन सुद्धा नगर रोड वरील शासकीय कार्यालयासमोर केवळ पुरूषांसाठीच स्वच्छतागृह बांधण्यात आली असून महिलांना दुय्यम स्थान देत त्यांची कुचंबना चालुच आहे. याप्रकरणात आता स्व. खा. केशरकाकुंनीच नगराध्यक्षांना सद्बुद्धी द्यावी व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात यावीत अशी मागणी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, शेख युनुस च-हाटकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री  महिला व बालकल्याण मंत्री, नगरविकास मंत्री, राज्य महिला आयोग यांना करण्यात आली आहे. 

सविस्तर माहातीसाठी :- बीड शहरातील नगररोडवरील शासकीय कार्यालयासमोर पंचायत समिती,जिल्हापरीषद,न्यायालय,पोलीस मुख्यालय, आदि.ठिकाणी नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2021 माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ शहर, सुंदर शहर अंतर्गत स्वच्छतागृह बांधण्यात आली आहेत मात्र ती केवळ पुरूषांसाठीच बांधण्यात आली आहेत, महिलांसाठी बांधण्यात आलीच नाहीत.

याप्रकरणात विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना लेखी तक्रार केल्यानंतर दि.15/10/2020 रोजी  विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद l(नगरपरिषद प्रशासन शाखा)यांनी जा. क्र. 2020/नपप्र/योजना-1/कावि/-582 पत्रकानुसार डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश ता.जि.बीड यांच्या ईमेल द्वारे दि.10/10/2020 रोजीच्या बीड शहरातील नगर रोड वरील शासकीय कार्यालयासमोर केवळ पुरूषांसाठीच स्वच्छतागृह बांधण्यात येत असून त्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था न करणा-या मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.असे निर्देश देऊन सुद्धा अद्याप कोणतीच सुधारणा करण्यात आली नाही. 

स्वच्छतागृह सदोष बांधणी, भांड्याची(urine pot)ऊंची जास्त, आऊटलेट व्यवस्थित नाही :- डाॅ.गणेश ढवळे 

पुरूषांसाठीच बांधण्यात आलेली स्वच्छतागृह सदोष बांधणीची आहेत,त्यात बसवलेली भांडी (urine pot)जास्त ऊंचीच्या ठिकाणी बसवण्यात आली आहेत, त्यामुळेच सर्वसामान्य माणसाला अडचण येत आहे, तसेच स्वच्छतागृहाचे आऊटलेट व्यवस्थित न काढल्याने घाण पाणी त्याठिकाणीच जमा होते, त्याचा निचरा होत नाही, म्हणून दुर्गंधी पसरलेली असते त्यामुळे नाक मुठीत धरून त्याचा वापर करावा लागतो.त्यांची दुरूस्ती करणं आवश्यक आहे. 

नविन वर्षात तरी नगराध्यक्षांना स्व. केशरकाकुंनीच सदबुद्धी द्यावी...

जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत विभागीय आयुक्त, मुख्यमंत्री,महिला व बालकल्याण मंत्री, पालकमंत्री यांना  वारंवार निवेदन देऊन तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी डाॅ.उत्कर्ष गुट्टे मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांना लेखी आदेश देऊन सुद्धा कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही त्यामुळेच निदान नविन वर्षात तरी नगराध्यक्षांना महिलांप्रति दुय्यम दर्जाची वागणुक देणं बंद करून महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात यावीत अशी सद्बुद्धी स्व. केशरकाकुंनीच द्यावी अशी मनोमन प्रार्थना करणार आहोत.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

___________