ट्रेनच्या शौचालयांमध्ये प्रसूती, धावत्या ट्रेनमध्ये महिलेने बाळाला दिला जन्म...

धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना पालघरमध्ये घडली आहे. वांद्रे गाजीपुर डाउन एक्स्प्रेसच्या एस-१२  डब्यात ही प्रसूती झाली.

ट्रेनच्या शौचालयांमध्ये प्रसूती, धावत्या ट्रेनमध्ये महिलेने बाळाला दिला जन्म...
Delivery in the toilets of the train, the woman gave birth to the baby in the running train ...
ट्रेनच्या शौचालयांमध्ये प्रसूती, धावत्या ट्रेनमध्ये महिलेने बाळाला दिला जन्म...
ट्रेनच्या शौचालयांमध्ये प्रसूती, धावत्या ट्रेनमध्ये महिलेने बाळाला दिला जन्म...

ट्रेनच्या शौचालयांमध्ये प्रसूती, धावत्या ट्रेनमध्ये महिलेने बाळाला दिला जन्म...

        धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना पालघरमध्ये घडली आहे. वांद्रे गाजीपुर डाउन एक्स्प्रेसच्या एस-१२  डब्यात ही प्रसूती झाली. राजेश विश्वकर्मा व त्यांची गर्भवती पत्नी गुडीया हे बांद्रा गाजीपुर या कोव्हीड विशेष ट्रेनमधून उत्तर प्रदेश येथील आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. वांद्रे येथून गाडी सुटल्यानंतर विरार स्थानक येताच या महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या. या वेदना सुरू झाल्यानंतर ती महिला थेट ट्रेनच्या शौचालयांमध्ये जाऊन तिने बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न केला. पश्चिम रेल्वे प्रशासनाला ही बाब कळताच पश्‍चिम रेल्वेने या ट्रेनला पालघर येथे थांबा देण्याचे निश्चित केले. त्याआधी पालघर रेल्वे स्थानक प्रशासनाने बाल रोग तज्ञ व स्त्री रोग तज्ञ डॉ. राजेंद्र चव्हाण यांना पाचारण केले होते. या महिलेची सुखरूप प्रसूत झालेल्यावर प्रसूती झालेल्या महिलेसह बाळाला आपल्या दवाखान्यात दाखल केले. यावेळी रुग्णवाहिका ही सज्ज ठेवण्यात आली होती. डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी औदार्य दाखवत या महिलेकडून एकही रुपया न घेण्याचे सूतोवाच केले. लॉकडाऊनदरम्यान ट्रेनमध्ये ही पहिलीच प्रसूती आहे.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

_________