चक्रीवादळाच्या 17 मे रोजी मुंबई-ठाण्यात चक्रीवादळ, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

मुंबईत 16 मे रोजी हे चक्रीवादळ येणार असल्याचा हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.

चक्रीवादळाच्या 17 मे रोजी मुंबई-ठाण्यात चक्रीवादळ, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी
weather update

चक्रीवादळाच्या 17 मे रोजी मुंबई-ठाण्यात चक्रीवादळ, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

Hurricane, 'Yellow Alert' issued by Meteorological Department in Mumbai-Thane on May 17

मुंबईत 16 मे रोजी हे चक्रीवादळ  येणार असल्याचा हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.

अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 17 मे रोजी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. मुंबई आणि ठाण्याला हवामान विभागाकडून 17 मे रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  16 आणि 17 मे रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.  

13 मे च्या सकाळीच दक्षिण पूर्व अरबी समुद्रात आणि लक्षद्वीपच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. 15 मे रोजी लक्षद्वीप आणि परिसरात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तीव्रता वाढत 16 मे रोजी चक्रीवादळामध्ये रुपांतरीत होणार आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार लक्षद्वीप बेट, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, दक्षिण कोकण, गोवा आणि गुजरात राज्यात 15 ते 18 मे याकाळात वादळाचा प्रभाव जाणवणार आहे. या काळात दक्षिण कोकणामध्ये वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 60 किलोमीटर इतका राहण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये सिंधुदु्र्गात विजांच्या कडकडाट, वेगवान वारे यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याच्या वेगामध्ये ताशी 60 कि.मी. पर्यंत वाढ होण्याची ही शक्यता आहे. 15 मे रोजी वाऱ्याचा वेग 70 कि.मी. पर्यंत वाढू शकतो असेही या इशाऱ्यामध्ये सांगितले आहे.

मुंबईत 16 मे रोजी हे चक्रीवादळ सक्रिय होणार असल्याचा हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईला या चक्रीवादळाचा धोका नसला तरीही मुंबई महानगरपालिका कोणताही धोका उद्भवू नये या दृष्टिकोनातून दक्षता घेत आहे.

हिंदी महासागराच्या उत्तरेला म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एरवी मान्सूनपूर्व काळात म्हणजे एप्रिल-मे दरम्यान चक्रीवादळांची निर्मिती झालेली दिसते. यंदा मात्र मेच्या मध्यावर पहिलं वादळ अरबी समुद्रात निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पूर आणि मुसळधार पावसाचं संकट सरकारी यंत्रणा आणि आरोग्य सुविधांवरचा ताण वाढवू शकतं, असं केंद्रीय पृथ्वी-विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी म्हटलं आहे.

गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीला निसर्ग या चक्रीवादळाचा थेट तडाखा कोकण किनारपट्टीला बसला होता.

इथून चक्रीवादळ पश्चिमेला ओमानच्या दिशेनं सरकू शकतं. ते पूर्वेला सरकलं, तर आधी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेशात त्याचा प्रभाव जाणवू शकतो आणि तिथून ते पुढे उत्तरेला गुजरात किंवा दक्षिण पाकिस्तानकडे सरकू शकतं. याविषयीची निश्चित माहिती 14 मे नंतरच कळू शकेल.

मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. नागरिकांनी समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे," असं रायगडच्या उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार लक्षद्वीप आणि केरळच्या परिसरात हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र तिथून चक्रीवादळ पुढे कुठल्या दिशेनं सरकेल, हे आत्ताच सांगता येणार नाही