काळेवाडी फाटा येथील हॉटेल व्हिक्टोरियामधील हुक्का पार्लरवर वाकड पोलिसांचा छापा...

काळेवाडी फाटा येथील हॉटेल व्हिक्टोरिया या ठिकाणी रात्री सुमारे साडे आकाराच्या सुमारास  वाकड पोलिसांनी छापा टाकून   हुक्का पार्लरसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले.तसेच हॉटेलचा  मालक अमित चोहान, मॅनेजर सलमान इसमाद्दीन काझी (वय ३० वर्षे,राहणार सुदर्शननगर चिंचवड पुणे,) मॅनेजरच्या सहकारी चिराग दिलीप वैष्णव व राघवेंद्र श्रीपद बानावडीकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

काळेवाडी फाटा येथील हॉटेल व्हिक्टोरियामधील हुक्का पार्लरवर वाकड पोलिसांचा छापा...
Wakad police raid hookah parlor at Hotel Victoria in Kalewadi Fata...

काळेवाडी फाटा येथील हॉटेल व्हिक्टोरियामधील हुक्का पार्लरवर वाकड पोलिसांचा छापा...

पिंपरी : काळेवाडी फाटा येथील हॉटेल व्हिक्टोरिया या ठिकाणी रात्री सुमारे साडे आकाराच्या सुमारास  वाकड पोलिसांनी छापा टाकून   हुक्का पार्लरसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले.तसेच हॉटेलचा  मालक अमित चोहान, मॅनेजर सलमान इसमाद्दीन काझी (वय ३० वर्षे,राहणार सुदर्शननगर चिंचवड पुणे,) मॅनेजरच्या सहकारी चिराग दिलीप वैष्णव व राघवेंद्र श्रीपद बानावडीकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास थेरगाव पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक पी एम चौघुले व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करत असताना त्याना माहिती मिळाली की,काळेवाडी फाटा येथील हॉटेल व्हिक्टोरिया याठिकांनी हुक्का पार्लर सुरू आहे. त्याची खातरजमा केली.संबधित खबर वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक याना दिली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल व्हिक्टोरिया वर छापा टाकला.त्यावेळी हॉटेलमधील ग्राहक मिळेल त्या मार्गे पळून गेले.मात्र प्रत्येक टेबलावर हुक्का पिण्याचे साहित्य आढळून आले. सुमारे १६ हजार १०० रुपयांचे साहित्य ताब्यात घेतले. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

पोलीस आयुक्तांने अवैध धंदे करणाऱयांनी आपले धंदे त्वरित बंद करावेत असे आवाहन केले होते, मात्र काही व्यावसायिक असे अवैध व्यवसाय सुरू ठेवत पोलिसांनाच आवाहन करत आहे. मात्र वाकड पोलिसांनी ही कारवाई करून  एक प्रकारे अशा अवैध व्यवसाय चालकांना धडा शिकविला आहे.

लोहगाव , पुणे

प्रतिनिधी - आत्माराम काळे

__________