वारकऱ्यांची प्रतीक्षा संपली उद्यापासून मंदिरे खुली होणार : ज्ञानेश्वर कवठेकर

देशासह महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळ  (मंदीरे) हे गेल्या नऊ दहा महिन्यापासून बंद केली होती कोरोना महामारी चा फैलाव होऊ नये म्हणून केंद्राने व राज्याने सर्व धार्मिक स्थळ बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे वारकऱ्यांमध्ये व भाविक भक्तांना प्रचंड नाराज होती. या नाराजीचे कारण मधल्या काळामध्ये मिशन बिगिनिंग च्या नावाखाली बरेच उद्योग व्यवसाय दारूची दुकाने हॉटेल रेस्टॉरंट हे सरकारने चालू केले होते. मग वारकऱ्यांनी सरकारला प्रश्न विचारला दारूची दुकाने हॉटेल रेस्टॉरंट हे खुली करण्यात आलेली आहेत.

वारकऱ्यांची प्रतीक्षा संपली उद्यापासून मंदिरे खुली होणार : ज्ञानेश्वर कवठेकर
Waiting for Warakaris is over, temples will be open from tomorrow : Dnyaneshwar Kavthekar

वारकऱ्यांची प्रतीक्षा संपली उद्यापासून मंदिरे खुली होणार: ज्ञानेश्वर कवठेकर

देशासह महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळ  (मंदीरे) हे गेल्या नऊ दहा महिन्यापासून बंद केली होती कोरोना महामारी चा फैलाव होऊ नये म्हणून केंद्राने व राज्याने सर्व धार्मिक स्थळ बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे वारकऱ्यांमध्ये व भाविक भक्तांना प्रचंड नाराज होती. या नाराजीचे कारण मधल्या काळामध्ये मिशन बिगिनिंग च्या नावाखाली बरेच उद्योग व्यवसाय दारूची दुकाने हॉटेल रेस्टॉरंट हे सरकारने चालू केले होते. मग वारकऱ्यांनी सरकारला प्रश्न विचारला दारूची दुकाने हॉटेल रेस्टॉरंट हे खुली करण्यात आलेली आहेत.

त्यामुळे वारकऱ्यांना दर्शनासाठी विठ्ठलाचे मंदिर खुले करण्यात यावे इतिहासात प्रथमच वारकरी आषाढी एकादशीचा सोहळ्याला यावर्षी मुकला होता. म्हणून विश्व वारकरी संघटनेने मंदिर खुले करण्यासाठी वारंवार प्रशासनाला व राज्य सरकारला विनंती केली निवेदने देण्यात आली.पण त्यांच्या विनंतीकडे व निवेदनाकडे सरकारने कानाडोळा केला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी या आंदोलनात सहभाग व पाठिंबा दिला त्यानंतर या आंदोलनाला धार आली वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर येथे लाखोच्या संख्येने मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाला महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातील वारकरी उपस्थित होते त्यानंतर सरकारने येणाऱ्या काळामध्ये लवकरच मंदिरे दर्शनासाठी खुली करू असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीला दिले होते उद्यापासून राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्‍यात येणार आहेत. वंचित बहुजन आघाडी च्या आंदोलनाला यश आले आहे म्हणून वारकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले आहेत.

बीड 

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

__________