वाडा दुय्यम निबंधकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले...

वाडा तालुक्यातील नोंदणी कार्यालयातील प्रभारी दुय्यम निबंधक वाडा यास एका बांधकाम व्यवासायिक कडून गाळ्याचे नोंदणी करण्यासाठी २०००० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वाडा दुय्यम निबंधकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले...
Wada secondary registrar caught red-handed by bribery prevention department ...

वाडा दुय्यम निबंधकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले...

वाडा तालुक्यातील नोंदणी कार्यालयातील प्रभारी दुय्यम निबंधक वाडा यास एका बांधकाम व्यवासायिक कडून गाळ्याचे नोंदणी करण्यासाठी २०००० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सदर माहिती नुसार तक्रारदार बांधकाम व्यवसायिक असून त्यानी बाधलेल्या दत्तात्रेय अपार्टमेंट इमारतीमधील गाला क्रमांक १० व ११ यांची विक्री करण्यात आली असून त्याचे नोंदणी करण्यासाठी आरोपी सर्जेराव अभिमान चाटे प्रभारी दुय्यम निबंधक वाडा यांनी एका गाळ्याचे पंधरा हजार रूपये दोन गळ्याचे तीस हजार रुपये एवढ्या रकमेची मागणी केली होती.म्ह्णून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतीबंधक विभाग पालघर येतेच यासंदर्भात तक्रार केली.

सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ०४ नोव्हेंबर रोजी पडताळणी साठी तक्रारदार यांना पंचासोबत वाडा कार्यालयात पाठवले असता सर्जेराव चाटे यांनी तडजोडी अंती एक गाळाचे दहा हजार रुपये व दोन गाळाचे वीस रुपये लाच मागीतल्याचे निष्पन्न झाल्यावर ०६ नोव्हेंबर रोजी ७ वाजता तक्रारदार बांधकाम व्यावसायिक कडून २०००० हजार रुपयांची लाच पंचा समोर घेताना रंगेहाथ पकडण्यात आहे.

सदर कारवाई करण्यात सापळा पथक के. एस. हेगाजे पोलीस उप अधिक्षक, भारत साळुंखे पोलीस निरीक्षक, मपोह/मांजरेकर,पोहवा/कदम, पोना /सुवारे, पोना/सुतार,  पोना/ सुमडा, पोना/चव्हाण , मपोना/जाधव, पोशी/ उमतोल, चापोशि/ दोडे, यांनी केली आहे.

वाडा

प्रतिनिधी : जयेश घोडविंदे

_________