स्रीभूषण रमाई आंबेडकर संस्था नागपुर ची भीमाई स्मारकाला भेट...| राजकुमार वंजारी यांनी कृतज्ञता व्यक्त करून मुरबाडकरांचे मानले आभार...
विश्वरत्न बोधिसत्व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आजोळ भूमी म्हणून जग प्रसिद्ध असलेले मुरबाड तालुक्यातील आंबेटेंभे हे गाव महामाता भिमाई यांचं माहेरघर असून अनेक परराज्यातून व विदेशातून भीम अनुयायी भिमाई यांचं दर्शन घेण्यासाठी व आवर्जून माहेरघर पाहण्यासाठी येत असतात.
स्रीभूषण रमाई आंबेडकर संस्था नागपुर ची भीमाई स्मारकाला भेट...
राजकुमार वंजारी यांनी कृतज्ञता व्यक्त करून मुरबाडकरांचे मानले आभार...
विश्वरत्न बोधिसत्व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आजोळ भूमी म्हणून जग प्रसिद्ध असलेले मुरबाड तालुक्यातील आंबेटेंभे हे गाव महामाता भिमाई यांचं माहेरघर असून अनेक परराज्यातून व विदेशातून भीम अनुयायी भिमाई यांचं दर्शन घेण्यासाठी व आवर्जून माहेरघर पाहण्यासाठी येत असतात त्यातच आज दिनांक 18 /12 /2020 रोजी नागपूर येथून स्रीभूषण रमाई आंबेडकर संस्था नागपुरच्या पदाधिका-यांनी भिमाई स्मारकाला भेट दिली असता भिमाई च्या आठवणी ऐकून भाराऊन गेले या भेटीदरम्यान नागपूरकरांनी भिमाई चे वंशज जीवन पंडित, अशोक पंडित ,वामन पंडित व भिमाई भूमी सामाजिक संस्थेचे सल्लागार शिवराम धनगर, अध्यक्ष भाऊसाहेब रातांबे, सचिव गुरुनाथ पवार , नितीन खंडागळे, भाऊ रणदिवे, राजेश पवार, पत्रकार लक्ष्मण पवार, प्रियाताई खरे व दादासाहेब खरे उपस्थित होते यावेळी स्री भूषण रमाई आंबेडकर नागपूर संस्थेचे अध्यक्ष राजकुमार वंजारी यांच्यासोबत देवयानी वंजारी, प्रगती पारशी, वंदना निकोसे, वनमाला वंजारे, शशिकला देशपांडे , अंजना मेश्राम ,प्रियांका देशपांडे, हेभीमाई भूमी ला भेट देण्यासाठी आले होते.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
___________