नारायण राणे यांच्यावर विनायक राऊतांचा पलटवार...

पावसाळा संपला तरी बेडकांची डराव-डराव संपली नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं. नारायण राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर बोलताना, 'येत्या काळात जनता राणेंना त्यांची जागा दाखवून देईन', असं विनायक राऊत म्हणाले.

नारायण राणे यांच्यावर विनायक राऊतांचा पलटवार...
Vinayak Raut's retaliation against Narayan Rane...

नारायण राणे यांच्यावर विनायक राऊतांचा पलटवार.

पावसाळा संपला तरी बेडकांची डराव-डराव संपली नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं. नारायण राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर बोलताना, 'येत्या काळात जनता राणेंना त्यांची जागा दाखवून देईन', असं विनायक राऊत म्हणाले.

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावरही घणाघाती हल्ला चढवला. राणे कुटुंबाच्या वाटेला जाऊ नका नाहीतर मातोश्रीच्या आत-बाहेर काय चालतं हे सगळं बाहेर काढीन आणि ते तुम्हाला जड जाईन, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.राणेंच्या टीकेवर विनायक राऊत म्हणाले, 'पावसाळा संपला असला तरी या बेडकांची डरावडराव गिरी संपलेली नाही. पण त्यांच्या डराव-डराव गिरीला कोणी घाबरत नाही. येत्या काही काळात जनता राणेंना त्यांची जागा दाखवून देईन'.

बारामती

प्रतिनिधी : रूपेश महादेव नामदास