विक्रमगड मध्ये बौध्द धम्माचा वर्षावास समारोपाचा कार्यक्रम संपन्न...

दि.૪/११/२०२० रोजी विक्रमगड (टोपलेपाडा) येथे भारतीय बौध्द महासभा विक्रमगड तालुका आयोजित वर्षावास समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

विक्रमगड मध्ये बौध्द धम्माचा वर्षावास समारोपाचा कार्यक्रम संपन्न...
Vikramgad Buddhist Dhamma's rainy season concluding program ...
विक्रमगड मध्ये बौध्द धम्माचा वर्षावास समारोपाचा कार्यक्रम संपन्न...

विक्रमगड मध्ये बौध्द धम्माचा वर्षावास समारोपाचा कार्यक्रम संपन्न...

दि.૪/११/२०२० रोजी विक्रमगड (टोपलेपाडा) येथे भारतीय बौध्द महासभा विक्रमगड तालुका आयोजित वर्षावास समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रवचनकार वक्ता म्हणुन केंद्रीय शिक्षक/बौध्दाचार्य/भारतीय बौध्द महासभा वाडा तालुका अध्यक्ष आयु.सुजयजी जाधव गुरुजी हे होते.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन भारतीय बौध्द महासभा पालघर जिल्हा अध्यक्ष आयु.किरण गायकवाड गरुजी, पालघर जिल्हा सरचिटणीस बौध्दाचार्य आयु.प्रकाश जाधव गुरजी व पालघर जिल्हा संस्कार विभाग सचिव बौध्दचार्य नारायण जाधव गुरुजी हे होते व सामाजिक कार्यकर्ते रिपाई (आ) पालघर जिल्हा संपर्क प्रमुख दादासाहेब मोरे उपस्थित होते व हा कार्यक्रम भारतीय बौध्द महासभा विक्रमगड तालुका अध्यक्ष आयु.राहुल दादासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला व या कार्यक्रमाला पालघर तालुका संघटक खरात गुरुजी आवर्जुन उपस्थित होते व वाडा तालुका माजी महिला उपाध्यक्ष महाले आजीसुध्दा आवर्जुन उपस्थित होत्या व भारतीय बौध्द महासभा विक्रमगड तालुक्याच्या कार्यकारणीतील पदाधिकारी आयु.अजयजी सोनोने, आयु.नरेशजी दोंदे सर, संगितराव गायकवाड, श्रीकांतजी गायकवाड, अशोकजी निकम, संतोषजी आल्हाड, विजय सोनोने, राजु भगत, अनिल ईंगोले, तेजुताई भगत, ईंदिराताई दोंदे, नंदाताई दादासाहेब मोरे, वनिता मोरे, वर्षाताई ईंगोले, यामिनीताई गायकवाड, तेजश्री राहुल मोरे, सौरभ नरेश दोंदे, प्रशांतजी गवळे उपस्थित होते.कार्यक्रमाला भोजनदानाची व्यवस्था आयु.दादासाहेब मोरे व आयु.नंदाताई दादासाहेब मोरे यांनी केली होती.

 विक्रमगड

प्रतिनिधी - अजय लहारे

_________