गुंड विकास दुबे यांच्या घरातून एके - ४७ आणि काडतूसे जप्त....

पोलिसांकडून लुटलेली शस्त्रे जप्त करण्यात आले तसेच विकास दुबे यांच्या घरातून एके -४७ आणि काडतुसे जप्त करणात आले.

गुंड विकास दुबे यांच्या घरातून एके - ४७ आणि काडतूसे जप्त....

गुंड विकास दुबे यांच्या घरातून एके - ४७ आणि काडतूसे जप्त.....

लखनऊ : कानपूर पोलीस हत्याकाडांतील आणखी एक आरोपी शशिकांत याला पोलिसांनी अटक केली आहे. यासह पोलिसांकडून लुटलेली शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. एडीजी प्रशांत कुमार यांनी मंगळवारी माहिती दिली की, पोलिसांकडून लुटलेली अनेक शस्त्रे बिकारू गावातून जप्त करण्यात आली आहेत. विकास दुबे यांच्या घरातून एके 47 आणि 17 काडतुसे सापडली आहेत.

एडीजी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, आणखी एक आरोपी शशिकांत याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस होते. शशिकांतने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी विकास दुबे यांच्या घरातून एके-47 आणि काडतुसे जप्त केली आहेत. यासह शशिकांतच्या घरातून एक रायफलही सापडली आहे.

एडीजी प्रशांत कुमार म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणात 21 आरोपी होते, ज्यात चार जणांना अटक करण्यात आली आहे. श्यामू वाजपेयी, जहान यादव, दयाशंकर अग्निहोत्री आणि शशिकांत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या चकमकीत आतापर्यंत 6 आरोपी ठार झाले आहेत, ज्यात विकास दुबे, राजाराम, अतुल दुबे, अमर दुबे, प्रभात मिश्रा आणि प्रवीण दुबे यांचा समावेश आहे.