बेड आणि व्हेंटिलेटरची कमरता ?

पुण्यातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात सध्या मोठ्या प्रमाणात बेड आणि व्हेंटिलेटरची कमरता आहे, पुण्यात corona स्थिती अवाक्याबाहेर;,PMC ने लष्कराकडे मागितली मदत.

बेड आणि व्हेंटिलेटरची कमरता ?
lack of ventilator bed

 बेड आणि व्हेंटिलेटरची कमरता?

पुण्यातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात सध्या मोठ्या प्रमाणात बेड आणि व्हेंटिलेटरची कमरता आहे,
 पुण्यात corona स्थिती अवाक्याबाहेर,PMC ने लष्कराकडे मागितली मदत.

पुण्यातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात सध्या मोठ्या प्रमाणात बेड व व्हेंटिलेटरची कमी जाणवनत आहे. त्यामुळे कोरोना स्थिती अवाक्याबाहेर जात असल्याचं पाहून पुणे महानगरपालिकेनं भारतीय लष्कराकडे मदत मागितली आहे.

कोरोना विषाणूची  स्थिती ही भयानक पणे  वाढत चालली आहे. देशात दररोज एक लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची  वाढ होतं आहे. यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात नोंदले जात आहेत. यातही मुंबई, पुणे आणि नागपुरात कोरोना स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. तर पुण्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणंही कठिण  आहे. पुण्यात आयसीयू आणि व्हेटिलेटर बेडचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेने  लष्कराकडे मदत मागितली आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोनावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुण्यात जवळपास 21 हजारांहून अधिक बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परंतु यातील बहुतांशी बेडला व्हेंटिलेटरची सुविधा नाही. पुण्यात 489 बेडला व्हेटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे. सोमवारी सायंकाळची स्थिती पाहता यापैकी एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याचं समोर आले होते.

मंगळवारी रात्री उशिरानंतर काही बेड उपलब्ध झाले. पण पुण्यात रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढताना  दिसत आहे.