संजय कारभारी यांच्या जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांना मिळणार विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन...

शासनातर्फे नागरिकांसाठी विविध सरकारी योजना राबविण्यात येत असतात. मात्र या योजना नागरिकां पर्यंत पोहोचत नसल्याने नागरिकांना त्याचा लाभ घेता येत नाही. यासाठी भारतीय जनता पार्टीचे कल्याण शहर सचिव संजय कारभारी यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन करण्याची सुविधा उपलब्ध केली असून या जनसंपर्क कार्यालयाचे गुरुवारी खासदार कपिल पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.

संजय कारभारी यांच्या जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांना मिळणार विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन...
Citizens will get guidance of various government schemes from Sanjay Karbhari's public relations office ...
संजय कारभारी यांच्या जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांना मिळणार विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन...
संजय कारभारी यांच्या जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांना मिळणार विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन...

संजय कारभारी यांच्या जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांना मिळणार विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन...

कल्याण : शासनातर्फे नागरिकांसाठी विविध सरकारी योजना राबविण्यात येत असतात. मात्र या योजना नागरिकां पर्यंत पोहोचत नसल्याने नागरिकांना त्याचा लाभ घेता येत नाही. यासाठी भारतीय जनता पार्टीचे कल्याण शहर सचिव संजय कारभारी यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन करण्याची सुविधा उपलब्ध केली असून या जनसंपर्क कार्यालयाचे गुरुवारी खासदार कपिल पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार तथा भाजपा प्रदेश संयोजक नरेंद्र पवार, शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, शहर सचिव संजय कारभारी आदी मान्यवर उपस्थित होते.

       सर्वसामान्य नागरिकांच्या फायद्यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना आहेत. यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी, अटल पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन पेन्शन योजना, आंतरजातीय विवाह योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, घरगुती कामगार योजना, आयुष्यमान भारत योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान उज्ज्वला योजना आदी योजनांचा समावेश आहे. या योजनांची माहिती नागरिकांना नसल्याने त्यांना या योजेनांचा लाभ घेता येत नाही.

नागरिकांची हि समस्या लक्षात घेऊन भाजपा  शहर सचिव संजय कारभारी यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात सरकारी योजनांची माहिती देण्याची आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात तसेच कशाप्रकारे या योजनांचा फायदा करून घेता येईल यासाठी सुविधा उपलब्ध केली आहे. कल्याण पश्चिमेतील गांधारी जवळ हे कार्यालय सुरु करण्यात आले असून या कार्यालयाचे गुरवारी उद्घाटन करण्यात आले. लॉकडाऊन काळात देखील  संजय कारभारी यांनी भरीव काम करीत समाजातील सर्वच घटकांना मदत केली आहे.

कल्याण, ठाणे

 प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________