वैकुंठ परिवार दीपोत्सव २०२०...| एक पणती पूर्वजांसाठी...

गेली २० वर्षे वैकुंठ परिवाराच्या वतीने आणि सर्वमंगल प्रतिष्ठान , सेवा वर्धिनी ,यमगरवाडी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने , नवी पेठ पुणे येथील स्मशानभूमीमध्ये एक पणती पूर्वजांसाठी हि संकल्पना घेऊन दीपोत्सव साजरा केला जातो . पूर्वजांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांचे पुण्यस्मरण म्हणून हा उपक्रम राबविला जातो यानिमित्ताने पाच हजार पणत्या प्रज्वलित करून आठवणींना उजाळा दिला.

वैकुंठ परिवार दीपोत्सव २०२०...| एक पणती पूर्वजांसाठी...
Vaikuntha Parivar Dipotsav 2020 ... | For a paternal ancestor
वैकुंठ परिवार दीपोत्सव २०२०...| एक पणती पूर्वजांसाठी...

वैकुंठ परिवार दीपोत्सव २०२०
एक पणती पूर्वजांसाठी 

पुणे : गेली २० वर्षे वैकुंठ परिवाराच्या वतीने आणि सर्वमंगल प्रतिष्ठान , सेवा वर्धिनी ,यमगरवाडी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने , नवी पेठ पुणे येथील स्मशानभूमीमध्ये एक पणती पूर्वजांसाठी हि संकल्पना घेऊन दीपोत्सव साजरा केला जातो . पूर्वजांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांचे पुण्यस्मरण म्हणून हा उपक्रम राबविला जातो यानिमित्ताने पाच हजार पणत्या प्रज्वलित करून आठवणींना उजाळा दिला.

कै. सुरेंद्र उर्फ भैया मोघे गुरुजी यांच्या कल्पनेतून हि कल्पना उदयास आली . यानिमित्ताने समाजामध्ये कला, आध्यत्मिक, शिक्षण, गोपालन, सामाजिक आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींना पुरस्कार  व आर्थिक मदत देऊन सन्मानित केले.

आत्तापर्यंत १) समरसता पुनरुत्थान गुरुकुलाम , चिंचवड २)नरवीर तानाजी मालुसरे गोशाळा ,वेल्हा ३)प.पु, सद्गुरूनाथ काका महाराज सेवा परिसर ट्रस्ट, सिंहगड रोड ४) महर्षीनगर वस्ती अभ्यासिका - अमर पोळ ५)पुणे महानगर धर्मजागरण मंच ६) राजे शिवराय प्रतिष्ठान, पुणे आदी संस्थांना सन्मानित केले आहे. पुण्याचे महापौर मा मुरलीधर मोहोळ हे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते आपल्या मनोगता मध्ये त्यांनी पुणे मनपा कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप प्रवक्ते मा संदीप खर्डेकर यांनी केले यामध्ये त्यांनी या कार्यक्रमा मागील भूमिका सांगितली तसेच वैकुंठ मधील अडचणी महापौर यांना सांगितले.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ॲड मंदार जोशी , राष्ट्रीय निमंत्रक , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) हे उपस्थित होते त्यांनी आपले मनोगतात असे सामजिक समरसता जपणारे कार्यक्रम हे ऊर्जा देणारे असतात असे सांगितले.

या प्रसंगी मा .शुभांगी तांबट ,सदस्या भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान ( पालावरची शाळा ) यांचे संस्थेला तसेच वैकुंठ स्मशानभूमी मधील कर्मचाऱ्यांचा भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला  तसेच मा.सोमदत्त पटवर्धन ,कार्यवाह सेवा वर्धिनी ,मा.राजाभाऊ गीजरे , नगरसेविका मा सौ मंजुषा खर्डेकर, कोथरूड नाट्य परिषद अध्यक्ष मा.सुनील महाजन, चित्रपट महामंडळ संचालिका मा.निकिता मोघे,जितेश दामोदरे, ॲड अर्चिता जोशी,रितेश अगरवाल यांची विशेष उपस्थिती होती.

यानिम्मिताने स्मशानभूमीतील कामगार वर्गाचे कौतुक व पूर्वजाना आदरांजली वाहता यावी म्हणून हा दीपोत्सव आयोजित केला होता.या निम्मिताने महात्मा फुले यांची पुन्यस्थिती तसेच भारतीय संविधानाचे पूजन व सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी विकास माने यांनी सूत्रसंचालन केले आणि मा.रवी ननावरे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.

जामखेड

प्रतिनिधी - प्रभाकर तिडके

___________