लसीकरण केंद्रांवर शेकडोंची गर्दी: रविंद्र चव्हाण

कल्याण डोंबिवलीत लसीकरणासाठी नागरीकांचे हाल सुरु आहेत. लसीकरण केंद्रावर शेकडोंची गर्दी असते.

लसीकरण केंद्रांवर शेकडोंची गर्दी: रविंद्र चव्हाण
vaccination centers news

लसीकरण केंद्रांवर शेकडोंची गर्दी: रविंद्र चव्हाण

Crowds of hundreds at vaccination centers

कल्याण डोंबिवलीत लसीकरणासाठी नागरीकांचे हाल सुरु आहेत. लसीकरण केंद्रावर शेकडोंची गर्दी असते.

कल्याण डोंबिवलीत लसीकरणासाठी नागरीकांचे हाल सुरु आहेत. लसीकरण केंद्रावर शेकडोंची गर्दी असते. मात्र लसींचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रांवर गोंधळाचे वातावरण आहे. यावरुन भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी राज्य सरकारसह ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

एकीकडे राज्य लसीकरणात एक नंबर असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे केंद्राकडून पुरवठा केला जात नाही, असं सांगितलं जातंय. एमएमआर रिजनमध्ये लस उपलब्ध करुन दिली जात नाही. राज्य सरकारचं लसीकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे, असा आरोप रविंद्र चव्हाण यांनी केला.

“राज्यात लसीकरणसंदर्भात सर्वच ठिकाणी बोंब आहे. सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. मात्र लसींचा साठा पुरेसा उपलब्ध होत नाही. नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. 45 पेक्षा जास्त वयाच्या नागरीकांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांचा दुसरा डोस घेण्याची वेळ आली आहे. तरी त्यांना दुसरा डोस मिळत नाही”, असं रविंद्र चव्हाण म्हणाले.

18 ते 44 वयोगटातील नागरीकांच्या लसीकरणासाठी केवळ कल्याण येथे आर्ट गॅललीत एकच केंद्र आहे. त्याठिकाणी मोठी गर्दी उसळते. इतकेच नाही. कल्याण पूर्वेतील प्रबोधनकार ठाकरे या शाळेत सुद्धा लसीकरणासाठी एकच गर्दी होते. याबाबत भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

कालच्या तारखेत केवळ 1 हजार 200 लसींचा डोस उपलब्ध झाला होता. महापालिकेची लोकसंख्या 20 लाखांची असताना इतके कमी डोस का उपलब्ध करुन दिले जात आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याठिकाणी सदस्य मंडळ नसल्याने महापालिकेत प्रशासकाच्या हाती कारभार आहे. त्यावर कोणाचाही वचक नाही. त्यावर कोणाचे नियंत्रण नाही. लसीकरणाचे नियोजन केले गेले पाहिजे. 18 ते 44 वयोगटासाठी अन्य ठिकाणी लसीकरणाची सोय उपलब्ध करुन दिली पाहिजे.

टोकण दिलेल्या नागरीकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन असलेल्यांनाच लस दिली जाईल, असे दुपारी सांगण्यात आले. त्यामुळे आम्हाला टोकण कशाला दिले? जर लस द्यायची नाही तर आधीच सांगितले पाहिजे होते ना? असा संतप्त सवाल त्यांनी केला. यावेळी केडीएमसीच्या उपायुक्त पल्लवी भागवत, केडीएमसीचे अधिकारी संदीप निंबाळकर यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. 

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत खाजगी आणि सरकारी लसीकरण केंद्रावर तीन महिन्यांपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यापासून लसीकरणास सुरुवारत करण्यात आली होती. त्यानंतर केंद्राकडून राज्याला लसीचा पुरवठा कमी करण्यात येत असल्याने लसींचा साठा कमी पडू लागला. त्याचा फटका कल्याण डोंबिवलीतील लसीकरणासही बसला आहे.

याआधी 45 वर्षे वय असलेल्यांना लसीकरण दिले जात होते. 1 मे पासून 18 ते 44 या वयोगटातील नागरीकांचे लसीकरण केले जाईल, असे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले. मात्र पुरेशा लसी उपलब्ध नसल्याने सर्व लसीकरण केंद्राचे लसीकरण बंद पडलं.

 दुसरा डोस घेण्याची वेळ झाली आहे. त्यांच्याकरीता पुरेसे डोस उपलब्ध करुन दिले गेले पाहिजेत”, असं चव्हाण म्हणाले.