UPSC चा निकाल जाहीर....| UPSC results announced ....| upsc result 2019

upsc result 2019 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2019 चे निकाल जाहीर केले आहेत.

UPSC चा निकाल जाहीर....| UPSC results announced ....| upsc result 2019
UPSC Civil Services Exam 2019 Results Declared...

upsc result 2019 :

UPSC चा निकाल जाहीर....

upsc results 2019 नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2019 चे निकाल जाहीर केले आहेत. प्रदीप सिंह देशात अव्वल आला, तर जतीन किशोर देशात दुसरा आहे. प्रतिभा वर्मा देशात तिसरी, तर महिला उमेदवारांमध्ये प्रथम आली आहे. (UPSC Civil Services Exam 2019 Results Declared Pradeep Singh Tops)

यूपीएससीने सप्टेंबर २०१९ मध्ये घेतलेल्या लेखी आणि फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२० मध्ये घेतलेल्या मुलाखती किंवा व्यक्तिमत्त्व चाचणीच्या निकालाच्या आधारे निकाल जाहीर केला. उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम यादी वेबसाईटवर घोषित केली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

2019 मध्ये प्रथमच सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत राबवल्या गेलेल्या ‘ईडब्ल्यूएस कोटा’ आर्थिकदृष्ट्या मागास अंतर्गत ७८ उमेदवारांची निवड झाली आहे. तर ११ उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील गुणवंत

नेहा भोसले – देशात १५
मंदार पत्की (बीड) – देशात २२ , राज्यात दुसरा
योगेश अशोकराव पाटील – देशात ६३
राहुल लक्ष्मण चव्हाण – देशात १०९

यूपीएससी दरवर्षी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस- IAS),भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस – IFS), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस- IPS)आणि इतर केंद्रीय सेवांसाठी परीक्षा घेते.

नागरी सेवा परीक्षा 2020 या ३१ मे रोजी होणार होत्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या ४ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.