केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रकृतीत सुधारणा...

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे. दि.२७ ऑक्टोबर ला त्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना व  त्यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले  यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रकृतीत सुधारणा...
Union Minister of State Ramdas Athavale's condition improves ...
केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रकृतीत सुधारणा...

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रकृतीत सुधारणा...

मुंबई दि. ५ : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे. दि.२७ ऑक्टोबर ला त्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना व  त्यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले  यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज ९ दिवसांनंतर रामदास आठवले यांची प्रकृती अत्यंत चांगली झाली असून कोरोनाचा धोका टळला आहे.सध्या कोणतीही काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगत ना रामदास आठवले यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आसल्याची अधिकृत माहिती त्यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले यांनी दूरध्वनीद्वारे  रिपाइं च्या प्रसिद्धी विभागाला  दिली आहे.

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले कोरोनावर मात करून लवकरच घरी परतणार आहेत.तसेच येत्या दि.९ नोव्हेंबर रोजी ना रामदास आठवले यांचे सुपुत्र कुमार जित आठवले यांचा वाढदिवस असून त्या आधीच ना. रामदास आठवले घरी परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणतीही काळजी करू नये ना रामदास आठवले यांची प्रकृती चांगली आहे अशी माहिती रिपाइं चे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र गुप्ता यांनी दिली आहे. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर ना.रामदास आठवले यांना १४ दिवस विलगीकरणात राहावे लागेल.तसेच पुढील महिना भर त्यांना पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल त्यामुळे कार्यकर्त्यांनी ना रामदास आठवले यांना थेट फोन करून त्रास देऊ नये असे आवाहन रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले आहे.

मुंबई

प्रतिनिधी -संजय बोर्डे

________