वीजबिल ५० टक्के माफ करण्यासाठी रिपाइंचे उद्या बांद्रा येथील जिल्हा अधिकारी कार्यालयावर आंदोलन...| केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वात राज्यभर रिपाइंचे वीजबिल माफीसाठी आंदोलन...

लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वीजबिलाची रक्कम ५० टक्के माफ करावी; विजबिल भरले नाही म्हणून कोणाचाही मीटर कट करू नये.

वीजबिल ५० टक्के माफ करण्यासाठी रिपाइंचे उद्या बांद्रा येथील जिल्हा अधिकारी कार्यालयावर आंदोलन...|  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वात राज्यभर रिपाइंचे वीजबिल माफीसाठी आंदोलन...
Ripai's agitation at district officer's office in Bandra tomorrow to waive 50% electricity bill ... | Union Minister of State Ramdas Athavale led agitation across the state for waiver of Ripa's electricity bill ...

वीजबिल ५० टक्के माफ करण्यासाठी रिपाइंचे उद्या बांद्रा येथील जिल्हा अधिकारी कार्यालयावर आंदोलन...

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वात राज्यभर रिपाइंचे वीजबिल माफीसाठी आंदोलन...

मुंबई दि. २४ : लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वीजबिलाची रक्कम ५० टक्के माफ करावी; विजबिल भरले नाही म्हणून कोणाचाही मीटर कट करू नये; तसेच अर्धे वीजबिल माफ करून उर्वरित विजबिल रक्कम भरण्यासाठी  
मासिक हफ्त्याने भरण्याची सवलत द्यावी या मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उद्या बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता बांद्रा पूर्वेतील मुंबई उपनगर जिल्हा अधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले करणार असल्याची माहिती या आंदोलनाचे संयोजक रिपाइं चे उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष विवेक पवार यांनी दिली आहे.उत्तर मुंबई जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष हरीहर यादव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात येणार आहेत अशी माहिती पत्रकार व रीपाई नेते संजय बोर्डे यांनी दिली

वीजबिल ५० टक्के माफ करावे या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्ष आक्रमक झाला असून  दि. 25 नोव्हेंबर रोजी राज्यभर अनेक जिल्ह्यात विजबिल ५० टक्के माफ करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबई

प्रतिनिधी - संजय बोर्डे

___________