भंडारा हादरला ..!! जादूटोण्याच्या संशयावरून ४ जणांना जिवंत जाळण्याचा पर्यन्त .....

भंडारा जिल्यात जादुटोण्याच्या संशयावरून गावातील जमावानं चौघांना निर्वस्त्र करून मारहाण त्यानंतर त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

भंडारा हादरला ..!! जादूटोण्याच्या संशयावरून ४ जणांना जिवंत जाळण्याचा पर्यन्त .....

भंडारा हादरला ..!! जादूटोण्याच्या संशयावरून ४ जणांना जिवंत जाळण्याचा पर्यन्त .....

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील राजापूर गावात भयानक घटना उघडकीस आली आहे. जादुटोण्याच्या संशयावरून गावातील जमावानं चौघांना निर्वस्त्र करून मारहाण केली. त्यानंतर त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

पुरोगामी महाराष्ट्र आहे असे जरी म्हणत असले तरी, अजूनही 'अंधश्रद्धेचं भूत' काही जणांच्या मानगुटीवर बसलेलं आहे. याच अंधश्रद्धेतून अघोरी प्रकार घडत आहेत. भंडाऱ्यातही भयानक प्रकार घडला आहे. अंगात संचारलेल्या महिलेनं चौघांची नावं घेतल्यानंतर गावकऱ्यांनी जादुटोण्याच्या संशयावरून त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतलं. त्यानंतर त्यांना जिवंत पेटवून देणार होते, पण तोपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानं मोठा अनर्थ टळला.