गायक अभिजित भट्टाचार्य यांच्या मुलाला कोरोनाची लागण...

गायक अभिजित भट्टाचार्य यांचा मुलगा ध्रुवला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे.

गायक अभिजित भट्टाचार्य यांच्या मुलाला कोरोनाची लागण...
मुलगा ध्रुव याला कोरोनाची लागण.....

गायक अभिजित भट्टाचार्य यांच्या मुलाला कोरोनाची लागण...

मुंबई : बॉलीवूड मधील कोरोना व्हायरसशी संबधित एक वाईट बातमी आहे. बच्चन कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बॉलीवूडमध्ये अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला आहे.आता गायक अभिजित भट्टाचार्य यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

गायक अभिजीत यांनी सांगितले की , त्यांचा मुलगा ध्रुव याला कोरोनाची लागण झाली आहे.ध्रुवचं वय २८ वर्षं आहे.त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणं होती. इतकंच नाही तर अभिजित यांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मुलगा ध्रुव  परदेशात जाण्याचं प्लांनिंग करत होता. सध्याच्या नियमांनुसार  त्याला प्रवास करण्याआधी कोरोना टेस्ट करणे गरजेचे होते तर तो त्याची टेस्ट करण्यासाठी गेला होता.

त्याच्यात कोरोनाची तशी कोणती लक्षणं नव्हती. साधा सर्दी आणि खोकला होता आता त्याने स्वतःला घरातच क्वारंटाईन करून घेतले आहे आणि तो काळजी घेत आहे. अभिजित यांनी सांगितले की आता काळजी करण्यासारखे तसे काही नाही आहे.