२० लाख कोटींचे पॅकेज गेले कुठे?; शरद पवार यांचा प्रश्न...

लॉकडाऊनमुळे थांबलेले अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे पॅकेज देशासाठी जाहीर केले. मात्र राज्यात सदरचे पॅकेज कुठेच दिसले नाही. मग हे पॅकेज गेले कुठे, असा सवाल राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केला. कोरोना काळात विरोधकांनी राजकारण करू नये, असा टोलाही त्यांनी दिला.

२० लाख कोटींचे पॅकेज गेले कुठे?; शरद पवार यांचा प्रश्न...
कोरोना काळात राजकारण करू नये , असे खा. शरद पवार म्हणाले...

२० लाख कोटींचे पॅकेज गेले कुठे?; शरद पवार यांचा प्रश्न...

नाशिक : लॉकडाऊनमुळे थांबलेले अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे पॅकेज देशासाठी जाहीर केले.मात्र राज्यात सदरचे पॅकेज कुठेच दिसले नाही. मग हे पॅकेज गेले कुठे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केला. कोरोनाच्या संकट काळात देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. पवार यांनी कोरोना उपाययोजना आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नाशिकला आरोग्य विज्ञान विद्यापीठ असतांना येथील डॉक्टर्स उपचारासाठी पुढे येत नसतील तर हे लक्षणे चांगले नाही. कोरोना महामारीच्या काळात खासगी डॉक्टर्स पुढे येत नसल्याच्या तक्रारी आहेत.

ते स्वत:हून पुढे येत नसतील तर त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा वापरण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनास देण्यात आल्या आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. समाधानाची बाब म्हणजे मुंबईचे चित्र बदलू लागले आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्याकरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे पवार यांनी सांगितले.