सोन्या - चांदीचे दर का वाढत आहे.... ??

आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमती वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे.

सोन्या - चांदीचे दर का वाढत आहे.... ??

सोन्या - चांदीचे दर का वाढत आहे ??

कोरोनाच्या काळातही देशभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे.तसेच जागतिक बाजारपेठेत मंदी आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही विविध प्रकारचे बदल होत आहेत. सोने-चांदीच्या दरातही मोठ्या प्रमाणात चढ- उतार होत आहे. सुवर्ण बाजारपेठेवर देखील याचा परिणाम होत आहे.अमेरीका आणि चीनमध्ये तणाव वाढत असल्यामुळे आतंरराष्ट्रीय पातळीवर यांच्यातील तणावाचा परिणाम निश्चित होईल त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. दरम्यान , मौल्यवान धातूची खरेदी आजही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते . त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ होत आहे असे एचडीएफसी सिक्युरिटीचे कमोडिटी अनलिस्ट तपन पटेल यांनी हे विश्लेषण केले आहे.