नाशिकमध्ये रूग्णांची लूट , जनरल वॉर्डमध्ये १० दिवसाचे बिल ३ लाख

राज्यात कोरोना रुग्णांची कशी लूट होत आहे याचं एक भयानक वास्तव….

नाशिकमध्ये रूग्णांची लूट , जनरल वॉर्डमध्ये १० दिवसाचे बिल ३ लाख

नाशिकमध्ये रूग्णांची लूट , जनरल वॉर्डमध्ये १० दिवसाचे बिल ३ लाख...

नाशिक, 23 जुलै : कोरोना या जिवघेण्या आजारामुळे संपूर्ण जगावर संकट ओढावलं आहे. त्यात हा संसर्ग पसरू नये म्हणून देश मार्च महिन्यापासून लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे देशासह राज्यावरही भीषण आर्थिक संकट ओढावलं आहे.अशात नाशिकमध्ये मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नाशिक शहरात कोरोना बाधित रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून कशी लूट सुरू आहे. याबद्दल एक भयानक वास्तव सामोर आले आहे.

नाशिक शहरातील वोकहार्ट हॉस्पिटल या हॉस्पिटल मध्ये १२ जुलैला रमेश करपे या रुग्णाला कोरोनाची लागण झाली म्हणून दाखल करण्यात आलं होतं. मात्र, या रुग्णालयाने अवघ्या १० दिवसात या रुग्णाला तब्बल ३ लाख रुपयांच बिल आकारलं आहे. विशेष म्हणजे हा रुग्ण १०दिवस केवळ जनरल वॉर्डमध्ये अॅडमिट होता. या १० दिवासात या रुग्णाला ना ICU ना व्हेंटिलेटर लावण्यात आलं. मात्र, तरीदेखील या हॉस्पिटनं हे अवाजवी बिल आकारलं.
दरम्यान रुग्णाच्या या नातेवाईकांनी या बाबत न्यूज १८ लोकमतकडे तक्रार केल्यानंतर न्यूज १८लोकमतची टीम या तक्रारीची निष्कर्ष लावण्यासाठी या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचली. नाशिक महानगरपालिकेनं शहरातील अशा अवाजवी बिल आकारणी करणाऱ्या हॉस्पिटलवर निगराणी ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकाशी संपर्क साधला.

यानंतर, नाशिक महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर तब्बल २ तासांनी पालिकेचे अधिकारी या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांनीही बिलाची तपासणी करत या बिलात अवाजवी बिल आकारल्याच प्रथम दर्शनी निष्पन्न झालं आणि यावर त्यांनी या हॉस्पिटलला नोटीस देत कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.

या सर्व प्रकारानंतर तब्बल सहा ते सात तासानंतर या हॉस्पिटलने या कोरोना बाधीत रुग्णाची सुटका केली. विशेष म्हणजे या रुग्णाच्या मेडिक्लेम कंपनीनेही या वोक्हार्ट हॉस्पिटलने आकारलेल ३ लाखाच बिल अवाजवी असल्याचं कारण देत शासनाच्या नियमाप्रमाणे केवळ 82 हजार रुपये इतकच बिल मंजूर करत वोक्हार्ट हॉस्पिटल प्रशासनाला उघड पाडलं. या सगळ्या चौकशीमुळे एका रुग्णाला न्याय मिळला असला तरी आज शहरात अशा अनेक रुग्णांकडून खाजगी हॉस्पिटल लाखो रुपये घेत आहेत.त्यामुळे प्रशासनाने कारवाई वृत्तीचा रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.