PUBG खेळून पुरग्रस्तांसाठी १० लाख रुपये जमवले...
यूट्यूबवरील हा एक प्रसिद्ध चेहरा असलेल्या अजय नागर याने ही रक्कम जमा केली आहे.

PUBG खेळून पुरग्रस्तांसाठी १० लाख रुपये जमवले...
PUBG या मोबाइल game मुळे काही तरुणाचे मानसिक आरोग्य बिघडल्याच्या आणि काहींनी नैराश्य आल्याने आत्महत्या केल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत.मात्र याच खेळाचा वापर करून एका तरुणाने पुरग्रस्तांसाठी १० लाख रुपयांची मदत केली आहे .
यूट्यूबवरील हा एक प्रसिद्ध चेहरा असलेल्या अजय नागर याने ही रक्कम जमा केली आहे.ही रक्कम बिहार आणि आसाममधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देत असल्याचे नागरने जाहीर केले आहे.
व्यावसाय करत असताना त्यांद्वारे समाजाचे भले करता येऊ शकले तर ते त्याचा फायदा आहे अस तो म्हणतो.
नागरचा भाऊ आणि व्यावस्थापक दीपक चार याने त्याला पबजी खेळून निधी गोळा करण्याची कल्पना सुचवली होती. त्यानुसार त्याने ही रक्कम जमवली आणि त्यामध्ये स्वतः चे १ लाख रुपये घालत ११ लाख ३१ हजार रुपयांचा निधी त्याने पुरग्रस्तांसाठी दान केला.
अजय नागर याने निधी जमा करण्यासाठी Ghost of Tsushima pacify आणि PUBG हे game खेळून पैसे जमवले.
हे game खेळत असताना ९० हजार लोक ऑनलाईन होते सर्वांनी मिळून १० लाख दिल्याने अजय ने ही रक्कम बिहार आणि आसाममधील पुरग्रस्तांसाठी दिली.