दिलासादायक बातमी !! देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ६३.१२ वर.....

24 तासांत सर्वाधिक रुग्ण झाले निरोगी, तर रुग्णांची संख्या 12 लाखांच्या जवळ...

दिलासादायक बातमी !!  देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ६३.१२ वर.....
24 तासांत सर्वाधिक रुग्ण झाले निरोगी, तर रुग्णांची संख्या 12 लाखांच्या जवळ....

  देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ६३.१२ वर...

नवी दिल्ली,२२ जुलै : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशात ११लाख ९२ हजार ९१५ कोरोना रुग्ण आहेत. आज सलग चौथ्या दिवशी २४ तासांत ३५ हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. २४ तासांत ३७ हजार ७२४ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, ६४८ लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज एकाच दिवसात तब्बल २७ हजार ५८९ रुग्ण निरोगी झाले. एकाच दिवसात सर्वात जास्त निरोगी रुग्णांचा रेकॉर्ड ब्रेक आकडा आहे. यासह भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर ६३.१२% झाला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार. देशात सध्या ४ लाख ११ हजार १३३सक्रीय रुग्ण आहेत. तर, २८ हजार ७३२ रुग्णांचा मृत्य़ू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण ७ लाख ५३ हजार ४९ रुग्ण निरोगी झाले आहेत. भारताचा सकारात्मकता दर १०.९९% आहे. जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत अमेरिका, ब्राझीनंतर तिसरा क्रमांक भारताचा आहे.

महाराष्ट्रातही निरोगी रुग्णांचा आकडा वाढला

महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचा संसर्ग कमी झालेला नाही, पण बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा आकडा मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत ८३६९ नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे, तर २४६ जणांना मृत्यू नोंदवण्यात आला आहे. दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. ७१८८रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ३ लाख २७ हजार ३१ एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा १२,२७६ वर गेला आहे.

18 कोटी भारतीयांमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडीज

भारतात दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांचं प्रमाणही वाढलं आहे आणि याचं कारण म्हणजे भारतात चाचण्याही मोठ्या प्रमाणात होत आहेत. थायरोकेअर या प्रायव्हेट लॅबने देशभरात केलेल्या अँटिबॉडी टेस्टचा अहवाल नुकताच जारी केला आहे. अहवालानुसार जवळपास 18 कोटी लोकांमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडीज असल्याचं दिसून आलं. देशातील जवळपास 15% भारतीयांमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडीज तयार झाल्यात. कोरोनाव्हायरसची लागण झालेली असल्यास त्याविरोधात शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. शरीरात अँटिबॉडीज असणं म्हणजे त्या व्यक्तीला आधी कोरोना झालेला असू शकतो.

What's Your Reaction?

like
0
dislike
0
love
0
funny
0
angry
0
sad
0
wow
0