सोन्याच्या भावात मोठी वाढ ; तर चांदी ६० हजाराच्या पुढे....

बाजारात बुधवारी सोन्याच्या भावात  मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं तसेच चांदी ६० हजारापुढे...

सोन्याच्या भावात मोठी वाढ ; तर चांदी ६० हजाराच्या पुढे....

सोन्याच्या भावात मोठी वाढ ; तर चांदी ६० हजाराच्या पुढे....

मुंबई: २२ जुलै २०२० सोने चांदी भाव,वायदा बाजारात बुधवारी सोन्याच्या भावात  मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. बुधवारी बाजार उघडताच सोन्याच्या भावात ५५८ रुपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे देशाची राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव ५०,०८५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. केवळ सोन्याच्या भावातच नाही तर चांदीच्या भावात बुधवारी मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं.

 एमसीएक्स वर चांदीच्या भावात तब्बल ३,७८८ रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे बुधवारी चांदीचा भाव ६१,१३० रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या तेजीमुळे भारतीय वायदा बाजारात  मध्ये मंगळवारी सप्टेंबर २०१३ नंतर प्रथमच सोन्याच्या भावाने ६४,००० रुपये प्रति किलोग्रॅमचा टप्पा ओलांडला. तर आता बुधवारी तर चांदीच्या भावाने ६१ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

मुंबईतील सोने-चांदीचा भाव

बुधवारी बाजार उघडताच मुंबईतील सोन्याच्या भावात किरकोळ म्हणजेच १० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९,११० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७,९१० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. चांदीच्या भावात तब्बल ५००० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे चांदीचा भाव ६०,४०० रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे.