मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान करोना पॉझिटिव्ह.......!!

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हेदेखील करोना संक्रमित आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. माझी राज्यातील जनतेला विनंती आहे की सावधानता बाळगा, छोटीशी चूकही करोनाला आमंत्रण देऊ शकते' असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान करोना पॉझिटिव्ह.......!!
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, माझ्यात कोविड १९ ची लक्षणं आढळली होती, त्यानंतर मी कोरोनाची टेस्ट केली, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची

लागण ....

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शिवराज सिंह चौहान यांनी स्वत: टि्वट करुन त्यांना करोनाची बाधा झाल्याची माहिती दिली आहे.

माझ्यामध्ये करोना व्हायरसची लक्षणे दिसत होती. त्यामुळे मी टेस्ट केली. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांची करोना टेस्ट करुन घ्यावी, तसेच त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घ्यावे” असे आवाहन शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे.

सर्व नियमांचे पालन करुन क्वारंटाइन होणार असल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे. त्यांनी सर्व नागरिकांना आपली काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

“करोनावर वेळीच उपचार झाले तर व्यक्ती बरी होते. २५ मार्चपासून मी दररोज संध्याकाळी राज्यातील करोनाच्या स्थितीची समीक्षा करण्यासाठी बैठक करायचो. आता मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून समीक्षा बैठक करण्याचा प्रयत्न करेन” असे शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.