मंडप डेकोरेटर्स असोसिएशन पालघर जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्या मान्य करण्यासाठी धरणे आंदोलन...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत टाळेबंदी असून लग्न समारंभ, धार्मिक विधी व राजकीय कार्यक्रमांना शासनाकडून निर्बंध घातले गेल्याने याचा फटका मंडप डेकोरेटर्स व त्या संलग्न असलेल्या व्यवसायिकांना बसत आहे. त्यामुळे मंडप डेकोरेटर्स असोसिएशन पालघर जिल्ह्याच्यावतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

मंडप डेकोरेटर्स असोसिएशन पालघर जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्या मान्य करण्यासाठी धरणे आंदोलन...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत टाळेबंदी असून लग्न समारंभ, धार्मिक विधी व राजकीय कार्यक्रमांना शासनाकडून निर्बंध घातले गेल्याने याचा फटका मंडप डेकोरेटर्स व त्या संलग्न असलेल्या व्यवसायिकांना बसत आहे. त्यामुळे मंडप डेकोरेटर्स असोसिएशन पालघर जिल्ह्याच्यावतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. शासन लग्नसमारंभासाठी व इतर उत्सवाच्या ठिकाणी ५० व्यक्तींसाठी परवानगी देत आहे. त्यामुळे कुठेही मंडप टाकला जात नाही.
त्यातच कोरोना काळात लग्न समारंभ, उत्सव साजरे करण्यास बंदी असल्याने याचा मोठा फटका मंडप व डेकोरेटर व्यवसायिकांना बसला आहे. त्यामुळे आर्थिक कणाच मोडला असून अनेकांच्या हातचे रोजगार गेले आहेत. अशा परीस्थितीत उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न व्यावसायिकांना पडला असल्याने कुठल्याही समारंभासाठी किमान पाचशे लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. या मागणीसाठी मंडप डेकोरेटर्स असोसिएशन पालघर जिल्ह्यातर्फे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनकर्ते यांची भेट आमदार राजेश पाटील यांनी घोतली असून त्यांच्या समस्या व मागण्यांसंदर्भात शासन दरबारी प्रयत्न करू असे आश्वासन आमदारांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
पालघर
प्रतिनिधी - राजेंद्र पाटील
__________