अखिल भारतीय ओबीसी महासभा ठाणे जिल्हा पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न...
अखिल भारतीय ओबीसी महासभा ठाणे जिल्हा शाखा अंतर्गत संपूर्ण जिल्ह्य़ात संघटना संपर्क व पदनियुक्ती अभियान राबविण्यात येत असून आज सोमवार दि. २ नोव्हेंबर रोजी प्रमुख मार्गदर्शक कोकण विभागीय अध्यक्ष मा. राजाराम ढोलम यांच्या उपस्थितीत पदनियुक्ती कार्यक्रम झाला.
अखिल भारतीय ओबीसी महासभा ठाणे जिल्हा पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न...
०२ नोव्हेंबर 2020 रोजी अखिल भारतीय ओबीसी महासभा ठाणे जिल्हा शाखा अंतर्गत संपूर्ण जिल्ह्य़ात संघटना संपर्क व पदनियुक्ती अभियान राबविण्यात येत असून आज सोमवार दि. २ नोव्हेंबर रोजी प्रमुख मार्गदर्शक कोकण विभागीय अध्यक्ष मा. राजाराम ढोलम यांच्या उपस्थितीत पदनियुक्ती कार्यक्रम झाला. सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक बांधिलकी जपणारे, समाजाच्या विकासासाठी धडपड करणारे मुरबाड येथिल समाजसेवक रमाकांत वामन हरड यांची नियुक्ती ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी तसेच नवीमुंबई मधील संयम स्वभाव, धडाडीचे नेतृत्व असलेले महेंद्र दौलत हरड यांची जिल्हा संघटक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे कोलबाड येथिल जिल्हा संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे आयोजक ओबीसी महासभा ठाणे जिल्हा अध्यक्ष धनाजी सुरोसे यावेळी संघटनेचे विचार मांडताना म्हणाले की, ओबीसी प्रवर्गातील 350 जातीं असलेल्या समाज बांधवाना एकत्र एकाच छताखाली घेऊन शेवटच्या घटकात येणारा ओबीसी बांधवांना त्यांच्या हक्काची जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघटन वाढवणे हिच काळाची आहे, जातीमुळे निर्माण होणारी अलिप्तता दूर करुन ओबीसी सारे भाऊ भाऊ स्वउद्धारासाठी लढा देऊ हे धोरण स्विकारुन या राष्ट्रीय संघटनेला जोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी जिल्हा सचिव जयवंत पाटील, उपाध्यक्ष सूरज शेटगे, मा. चंद्रकांत हरड, अमोल पडवळ, सुनील विश्वकर्मा, प्रकाश कदम, आदी उपस्थित होते.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
_________