तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रास कायाकल्प पुरस्कार प्राप्त...

पालघर जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या कायाकल्प कार्यक्रमात जिल्हयातील सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्रा. आ. केंद्रे यांनी सहभाग नोंदवला होता.

तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रास कायाकल्प पुरस्कार प्राप्त...
Talwada Primary Health Center receives rejuvenation award ...

तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रास कायाकल्प पुरस्कार प्राप्त...

      पालघर जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या कायाकल्प कार्यक्रमात जिल्हयातील सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्रा. आ. केंद्रे यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये विक्रमगड तालुक्यातील तलवाडा प्रा. आ. केंद्राने ९०% गुण मिळवून जिल्हयात प्रथम क्रमांकाचे
पारितोषिक पटकावले आहे.

        आरोग्य संस्थांचा दर्जा वाढविणे करिता राष्ट्रिय आरोग्य अभियांनातर्गत गुणवत्ता
आश्वासन कार्यक्रम राबविला जातो. गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाअंतर्गत, आरोग्य संस्थामार्फत स्वच्छता व संक्रमण नियंत्रण पध्दतीचा उपयोग वाढविण्यासाठी कायाकल्प कार्यक्रमाअंतर्गत विविध आरोग्य संस्थाचे मुल्यांकन केले जाते. कायाकल्प योजनेअंतर्गत विजेता संस्था राष्ट्रिय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाकरिता नामनिर्देशीत केल्या जातात. राष्ट्रिय गुणवत्ता आश्वसन कार्यक्रमांतर्गत यापूर्वी जिल्ह्यातील दोन संस्था प्रा. आ. केंद्र,घोलवड व प्रा. आ. केंद, जामसर यांना राष्ट्रिय मानांकन प्राप्त झाले आहे.

         कायाकल्प कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालय जिल्हा स्तरीय मुल्यांकनात पतंगशहा
कुटीर रुग्णालय, जव्हार यास ७३.३०% गुण प्राप्त झाले असून उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला.
आहे. तर प्रा. आ. केंद्र नांदगाव ८१.१०%, साकुर ७८.१०%, साखरशेत ७३.३०% ता.जव्हार,  व प्रा. आ. केंद्र आमगाव, ता. तलासरी ७०.८०% गुण प्राप्त करून उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले आहे. राष्ट्रिय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सन २०२०/२१ राष्ट्रिय मुल्यांकना करिता वरिल सर्व विजेता प्रा. आ. केंद्राचे नामनिर्देशन राज्यस्तरावरुन करण्यात आले आहे. सर्व विजेता संस्थाचे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढिल वाटचाली साठी आरोग्य समिती सभापती निलेश सांबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

  ___________