परळी, अंबाजोगाईसह आष्टी तालुक्यातील पीक नुकसानीचे फेर पंचनामे करण्याचे स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य चे  सरचिटणीस वैजनाथ गुट्टे यांचे निर्देश...

बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई व आष्टी तालुक्यातील परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने फेर पंचनामे करून सुधारित अहवाल सादर करण्याचे निर्देश स्वाभिमानी संघर्ष सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैजनाथ गुट्टे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

परळी, अंबाजोगाईसह आष्टी तालुक्यातील पीक नुकसानीचे फेर पंचनामे करण्याचे स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य चे  सरचिटणीस वैजनाथ गुट्टे यांचे निर्देश...
Swabhimani Sangharsh Sena Maharashtra State General Secretary Vaijnath Gutte's instructions to conduct re-panchnama of crop loss in Parli, Ambajogai and Ashti talukas ...

परळी, अंबाजोगाईसह आष्टी तालुक्यातील पीक नुकसानीचे फेर पंचनामे करण्याचे स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य चे  सरचिटणीस वैजनाथ गुट्टे यांचे निर्देश...

बीड (दि. ३०) : बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई व आष्टी तालुक्यातील परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने फेर पंचनामे करून सुधारित अहवाल सादर करण्याचे निर्देश स्वाभिमानी संघर्ष सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैजनाथ गुट्टे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यात आला असून, त्यामध्ये परळी, अंबाजोगाई व आष्टी तालुक्यांचा ३३% पेक्षा अधिक नुकसानीचा अहवाल निरंक असल्याच्या बातम्या काही दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याने वैजनाथ गुट्टे यांनी तातडीने फेर पंचनामे करावेत असे निर्देश दिले आहेत. 

राज्य शासनाने घोषित केलेल्या १० हजार कोटींच्या पॅकेज मधून शेतकऱ्यांना थेट मदत मिळण्यासाठी कृषी व महसूल विभागाने केलेले हे पंचांनामे महत्वाचे ठरणार आहेत. या पंचनाम्यांमध्ये मानवी दोष असून, त्यामुळेच तीन तालुक्यातील ३३% पेक्षा जास्त नुकसानीचा अहवाल निरंक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने कोणत्याही प्रकारची हयगय न करता तातडीने फेर पंचनामे करावेत असे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले असून, शेतकऱ्यांनी काळजी करू नये, नाहीतर स्वाभिमानी संघर्ष सेनेचा पूर्ण महाराष्ट्रभर आंदोल छेडण्याचा इशारा करत आहे.

बीड 

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

_________