स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भारत बंदला जाहीर पाठींबा...| नायब तहसीलदार प्रकाश बुरूंगळे यांना दिले निवेदन...

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिल्ली येथील सुरू असणार्या आंदोलनाला पाठींबा देऊन भारत बंद सहभाग नोंदवून पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार प्रकाश बुरूंगळे यांना लेखी निवेदन दिले.

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भारत बंदला जाहीर पाठींबा...

नायब तहसीलदार प्रकाश बुरूंगळे यांना दिले निवेदन...

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिल्ली येथील सुरू असणार्या आंदोलनाला पाठींबा देऊन भारत बंद सहभाग नोंदवून पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार प्रकाश बुरूंगळे यांना लेखी निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे तात्काळ रद्द करावे हे कायदे उद्योगपतीच्या हिताचे असुन शेतकर्यानवर अन्याय करणारे आहे म्हणून शेतमालाला किमान हमी भाव मिळावा.

शेतमालाचे बाजारभाव पडल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्याचा माल सरकारने विकत घ्यावा रात्रीची लोडशेडिंग रद्द करून कृषी पंपासाठी दररोज दिवसभर लाईट देण्यात यावी तसेच थकीत शेतकर्याचे विज बिल माफ करा व इतर मागण्याचे निवेदन सादर केले.

जर आजच्या भारतबंद ची दखल शासनाने घेतली नाही तर पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा महेंद्रभाऊ पगारे यांनी दिला.

यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे, विजय घोडेराव, विनोद त्रिभुवन,वसंत घोडेराव,विजय पगारे,गणेश जाधव,महेंद्र खळे,संदीप भालेराव,वाल्मिक गायकवाड,संतोष गायकवाड,बाळासाहेब सोनवणे,बाळासाहेब चंदन यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

येवला तालुका

प्रतिनिधी - शशिकांत जगताप

___________