स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19 वी ऊस परिषद कोल्हापूरमध्ये सुरू...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19 वी ऊस परिषद कोल्हापूरमध्ये सुरू आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19 वी ऊस परिषद कोल्हापूरमध्ये सुरू...
19th Sugarcane Conference of Swabhimani Shetkari Sanghatana starts in Kolhapur ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19 वी ऊस परिषद कोल्हापूरमध्ये सुरू...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19 वी ऊस परिषद कोल्हापूरमध्ये सुरू आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. तसंच येत्या 5 नोव्हेंबरला देशात किमान 2 तास रस्ता रोको करणार, अशी घोषणा शेट्टी यांनी केली आहे.

'मुख्यमंत्री नसताना जी मागणी केली ती मुख्यमंत्री असताना पूर्ण केली असती तर शेतकरी समाधानी झाला असता,' असा टोला राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसंच संपूर्ण महाराष्ट्रातील एकही प्रदेश अतिवृष्टीतून सुटला नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे...याला शेतकरी जबाबदार आहे का?जागतिक तापमान वाढीमुळे असं होत आहे, असं अभ्यासक सांगत आहेत. याला शेतकरी जबाबदार नसताना शेतकऱ्यांनीच का भोगायचं? असा सवाल स्वाभिमानाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे.

बारामती

प्रतिनिधि - रूपेश महादेव नामदास 

_________