पालघर रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा राष्ट्रध्वज डौलाने फडकला... | रेल्वे प्रवासी संघटना, पालघर वासीयांच्या प्रयत्नांना यश, तर आमदार श्रीनिवास वनगा यांची शिष्टाई सफल...

भारतीय रेल्वेतर्फे देशातील प्रमुख आणि महत्त्वांच्या रेल्वे स्थानकांवर ३०×२० फुटाचा आणि १०० फूट उंचीवर राष्ट्रध्वज फडकविण्यात आले. पालघर जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असून रेल्वे स्थानक हे जिल्हा मुख्यालयाचे स्थानक असल्यामुळे या स्थानकात साधारणता वर्षभरापूर्वी तिरंगा फडकविण्यात आला होता.

पालघर रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा राष्ट्रध्वज डौलाने फडकला... | रेल्वे प्रवासी संघटना, पालघर वासीयांच्या प्रयत्नांना यश, तर आमदार श्रीनिवास वनगा यांची शिष्टाई सफल...
Doula once again hoisted the national flag at Palghar railway station ... | Success to the efforts of Railway Passengers Association, Palghar residents, while the discipline of MLA Srinivas Vanaga was successful ...
पालघर रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा राष्ट्रध्वज डौलाने फडकला... | रेल्वे प्रवासी संघटना, पालघर वासीयांच्या प्रयत्नांना यश, तर आमदार श्रीनिवास वनगा यांची शिष्टाई सफल...
पालघर रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा राष्ट्रध्वज डौलाने फडकला... | रेल्वे प्रवासी संघटना, पालघर वासीयांच्या प्रयत्नांना यश, तर आमदार श्रीनिवास वनगा यांची शिष्टाई सफल...

पालघर रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा राष्ट्रध्वज डौलाने फडकला...

रेल्वे प्रवासी संघटना, पालघर वासीयांच्या प्रयत्नांना यश, तर आमदार श्रीनिवास वनगा यांची शिष्टाई सफल...

भारतीय रेल्वेतर्फे देशातील प्रमुख आणि महत्त्वांच्या रेल्वे स्थानकांवर ३०×२० फुटाचा आणि १०० फूट उंचीवर राष्ट्रध्वज फडकविण्यात आले. पालघर जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असून रेल्वे स्थानक हे जिल्हा मुख्यालयाचे स्थानक असल्यामुळे या स्थानकात साधारणता वर्षभरापूर्वी तिरंगा फडकविण्यात आला होता. पण विविध तांत्रिक अडचणी आणि कारणे सांगून ऑगस्ट महिन्यापासून सदर राष्ट्रध्वज उतरवून ठेवण्यात आला होता. याबाबत प्रवाशांनी आणि प्रवासी संघटनांनी वेळोवेळी पाठपुरावा करून मुद्दा उचलून धरला होता. परंतु निर्ढावलेले रेल्वे प्रशासनाकडून थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ खाऊ पणा सुरू होता.

प्रत्येक वेळी आज लावतो, तर ४ दिवसांनी लावतो अशा पोकळ आश्वासना पलिकडे काहीच माहिती मिळत नव्हती. शेवटी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था व इतर प्रवाशी संघटनांनी पालघर आमदार श्रीनिवास वनगा यांची भेट घेऊन सदर प्रकार सांगितला. लगेचच आमदार साहेबांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले की, २५ नोव्हेंबरपर्यत तिरंगा लावण्यात येईल.

मात्र २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आमदार वनगा यांनी पालघर रेल्वे स्थानकात प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असता तिरंगा लावण्यात आला नसल्याचे दिसून आले. यानंतर आमदार, पालघर स्टेशन सल्लागार समिती, प्रवाशी संघटनांनी उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला असता एकाही रेल्वे अधिकाऱ्यांनी योग्य उत्तर दिले नाही. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साधे फोन उचलण्याचे सौजन्य देखील दाखवले नाही. झालेला प्रकार पाहता आमदारांनी तीव्र भाषेत असंतोषाची भावना व्यक्त केली.

रेल्वे प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींना दिशाभूल करणारी माहिती दिली जाते. तर सामान्य माणसांचे काय? संविधान दिनाच्या दिवशी सुद्धा राष्ट्रध्वज लावला जात नसेल तर काय म्हणावे. हा रेल्वे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चालणार नाही. सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत तिरंगा फडकला नाही. तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहिल.

या नंतर हालचालींना वेग येऊन अखेर ३० तारखेला पालघर रेल्वे स्थानकात आमदार श्रीनिवास वनगा यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. यावेळी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था, पालघर स्टेशन कमिटी, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शहा, शिवसेना पालघर जिल्हा व पालघर शहर पदाधिकारी, पालघर स्थानक मास्तर संजय पाटील व राजेश पाटील, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, गव्हरमेंट रेल्वे पोलिस,आय ओ डब्ल्यू कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

___________