मुरबाड तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता द्यावी यासाठी आरोग्यमंत्री ना.राजेशराव टोपे यांना साकडे !!

मंगळवार, दि.१० नोव्हेंबर २०२० रोजी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेशराव टोपे हे कल्याण येथे राजकीय दौऱ्यावर असताना मुरबाड  तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता द्यावी अश्या मागणीचे निवेदन काँग्रेस पक्षाचे पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात तसेच मा.अमोल सुरोशी, मा.नेताजी लाटे आदींच्या उपस्थितीत देण्यात आले तसेच यावेळी सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव हे देखील उपस्थितीत होते.

मुरबाड तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता द्यावी यासाठी आरोग्यमंत्री ना.राजेशराव टोपे यांना साकडे !!
Sakade to Health Minister Rajeshwar Tope for approval of Sub-District Hospital in Murbad taluka !!
मुरबाड तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता द्यावी यासाठी आरोग्यमंत्री ना.राजेशराव टोपे यांना साकडे !!

मुरबाड तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता द्यावी यासाठी आरोग्यमंत्री ना.राजेशराव टोपे यांना साकडे !

 मंगळवार, दि.१० नोव्हेंबर २०२० रोजी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेशराव टोपे हे कल्याण येथे राजकीय दौऱ्यावर असताना मुरबाड  तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता द्यावी अश्या मागणीचे निवेदन काँग्रेस पक्षाचे पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात तसेच मा.अमोल सुरोशी, मा.नेताजी लाटे आदींच्या उपस्थितीत देण्यात आले तसेच यावेळी सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव हे देखील उपस्थितीत होते. मुरबाड तालुक्यामध्ये जवळपास २.५० लाख लोकसंख्या असुन शेतकरी, कामगार व शेतमजुरांची संख्या ८० % च्या जवळपास आहे तर सद्दस्थितीला ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मुरबाड शहरांमध्ये आहे.

कोरोना महामारीच्या काळामध्ये तालुक्यात असलेली आरोग्य व्यवस्था व अपुरे असलेले वैदकीय अधिकारी-कर्मचारी यामुळे रुग्णाचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर हे शहरी भागामध्ये झाले पंरतु कमी दरडोई उत्पन्न लोकवस्तीचा तालुका सरकारी यंत्रणेवरच अवलंबुन राहावे लागते. मुरबाड तालुक्यातील मायबाप जनता ही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे त्यामुळे आपण तात्काळ सदरील मागणी मान्य करावी अशी मागणी चेतनसिंह पवार यांनी केली.

मुरबाड

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार

_________