उद्याचा कडकडीत बंद पाळा - कुलदीप करपे | शेतकरी संघटनांच्या राष्ट्रव्यापी 'भारत बंद’ आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सक्रिय सहभाग...

केंद्र सरकारने चर्चेविना नवा कृषी कायदा अंमलात आणत शेतकऱ्यांना जाचक असणाऱ्या तरतुदी लादल्या आहेत. शेतकरी संघटनांशी याबाबत केंद्र सरकारच्या झालेल्या चर्चेच्या फेऱ्या अपयशी ठरल्या.

उद्याचा कडकडीत बंद पाळा - कुलदीप करपे | शेतकरी संघटनांच्या राष्ट्रव्यापी 'भारत बंद’ आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सक्रिय सहभाग...
Strictly follow tomorrow - Kuldeep Karpe | Active participation of Swabhimani Shetkari Sanghatana in the nationwide 'Bharat Bandh' movement of farmers' organizations ...

उद्याचा कडकडीत बंद पाळा - कुलदीप करपे 

शेतकरी संघटनांच्या राष्ट्रव्यापी 'भारत बंद’ आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सक्रिय सहभाग...

केंद्र सरकारने चर्चेविना नवा कृषी कायदा अंमलात आणत शेतकऱ्यांना जाचक असणाऱ्या तरतुदी लादल्या आहेत. शेतकरी संघटनांशी याबाबत केंद्र सरकारच्या झालेल्या चर्चेच्या फेऱ्या अपयशी ठरल्या. त्यामुळे या कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे. 

बीड जिल्ह्यात सर्व व्यापारी,ग्राहक, शेतकरी यांनी उद्याच्या किसान महाआंदोलनात सहभाग नोंदवून केंद्र सरकार विरुद्ध कडकडीत आपले सर्व आर्थिक व सार्वजनिक व्यवहार बंद ठेऊन सहकार्य करण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले आहे.
या ‘भारत बंद’महाआंदोलनात  स्वाभिमानी शेतकरी संघटना सक्रिय समर्थन देत आहे. बीड जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या  सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शांतपणे तसेच कोविडकाळातील मर्यादांचे पालन करून या ‘भारत बंद’मध्ये सहभागी व्हावे व या कायद्याविषयी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करावा.

कुलदीप करपे पक्ष जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना,बीड जिल्हा

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

___________