पालघर केळवे सफाळे रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको... | सफाळे रेल्वेस्थानकात रेल रोको सुरूच...

आजपासून मुंबई कडे जाणाऱ्या सौराष्ट्र मेलची वेळ सकाळी ५:१० ऐवजी २:४५ केल्याने तसेच सकाळी ५:१५ ची डहाणू-चर्चगेट लोकल रद्द करण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ पालघर रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केले.

पालघर केळवे सफाळे रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको...

सफाळे रेल्वेस्थानकात रेल रोको सुरूच...

आजपासून मुंबई कडे जाणाऱ्या सौराष्ट्र मेलची वेळ सकाळी ५:१० ऐवजी २:४५ केल्याने तसेच सकाळी ५:१५ ची डहाणू-चर्चगेट लोकल रद्द करण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ पालघर रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केले. पालघर पाठोपाठ केळवे रोड व पुढे सफाळे रेल्वे स्थानकात देखील प्रवासी रेल्वे मार्गावर उतरले व त्यांनी मार्ग रोखून धरला. यावेळी सफाळे रेल्वे स्थानक येथे राजधानी एक्सप्रेस रोखून धरली.

तर डहाणू कडे जाणारी लोकली ही सफाळे स्थानकातच थांबविण्यात आली. सकाळी 7 वाजेपर्यंत हे रेल रोको आंदोलन सुरू होते. रेल्वे कडून वेळापत्रकात केलेले बदल मागे घेण्यात येतील आणि ४:४० ची पहिली चर्चगेट लोकल सुरू ठेवण्यात येईल. असे आश्वासन मिळाल्यानंतर सफाळे स्थानकातील रेल रोको आंदोलन प्रवाशांनी मागे घेतले.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

___________