संविधान गौरव सप्ताह जाहीर करण्याबाबत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , जिल्हाधिकारी,मुंबई पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त आयुक्त मुंबई, पोलीस उपायुक्त परी १२ यांना महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे निवेदन...
महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारत देशाला संविधान अर्पण केले.आणि आपला देश ख-या अर्थाने प्रजासत्ताक झाला.

संविधान गौरव सप्ताह जाहीर करण्याबाबत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , जिल्हाधिकारी,मुंबई पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त आयुक्त मुंबई, पोलीस उपायुक्त परी १२ यांना महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे निवेदन...
महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारत देशाला संविधान अर्पण केले.आणि आपला देश ख-या अर्थाने प्रजासत्ताक झाला.भारत देशातील सर्व जात थर्म पंथ यांना समानतेच्या एका धाग्यात गुंफण्याचे सामर्थ्य भारतीय संविधानामध्ये आहे. राष्ट्रीय ग्रंथ समजल्या जाणा-या भारतीय संविधानानुसार वाटचाल करीत असलेला आपला देश जगातील बलाढ्य राष्ट्रापैकी एक लोकशाही प्रधान देश म्हणून आज गणला जात असून याचा तमाम भारतीयांना सार्थ अभिमान आहे.
महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता.विविध विषयांवरील ग्रंथ संपदा.जगातील सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून कोलंबिया विद्यापीठाने त्यांच्या आवारात उभारलेला डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचा दिमाखदार पुतळा याचाही देशातील भारतीयांना अभिमानच आहे. त्यामुळे या महापुरूषाला जातीच्या चौकटीत बंद करता येत नाही. भारतीय संविधान आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे तमाम भारत देशाचा गौरव असला तरी सर्वश्रेष्ठ गणल्या गेलेल्या भारतीय संविधानाला बदलण्याच्या चर्चा होत असून वेगळे संविधान निर्माण करण्याच्याही वायफळ गप्पा करून संविधानाविषयी संभ्रम पसरविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
अशावेळीभारतीय संविधान काय आहे संवैधानिक अधिकार काय आहेत संविधानाने आपल्याला काय काय दिले याविषयी जनतेमध्ये सर्वंकष माहिती जाणे ही काळाची गरज आहे.यासाठी राज्य सरकारच्या प्रबळ ईच्छाशक्तीची गरज आहे.
राज्य सरकार सामाजिक न्याय विभागामार्फत संविधान समता सप्ताह पाळते परंतु डाॅ बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान केवळ सामाजिक न्याय विभागापुरते मर्यादीत नसून राज्य सरकारने संविधान गौरव सप्ताह जाहीर करावा. यासाठी वरिष्ठ पत्रकार राजू झनके यांच्या सल्ल्याने व महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे यांच्या आदेशाने
निवेदनाच्या माध्यमातून खालील सूचना करण्यात आल्या.
१) शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा समावेश करावा.
२) राज्य सरकारने संविधान गौरव आठवडा जाहीर करावा.
३) २६ नोव्हेंबर रोजी सरकारी निमसरकारी खाजगी आस्थापना,शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी संविधान उद्देशिका किंवा प्रस्तावनेचे जाहीर वाचन करण्याचे आदेश परीपत्रकाद्वारे जारी करावे.
४) संविधान गौरव आठवड्यात संविधानावर तज्ञांमार्फत व्याख्याने परीसंवाद, कार्यशाळा ,विविध स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करावे.
५) संविधान जागृतीवर काम करणा-या मान्यवरांचा संविधान गौरव पुरस्कार देऊन सन्मान करावा.
महोदय फुले शाहू आंबेडकर व छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणारे आपले हे महाविकास आघाडीचे सरकार या मागणीचा सन्मानच करेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
मुंबई
प्रतिनिधी - संजय बोर्डे
___________