आम्ही जगायचं कसं? (एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा) एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश...

कोरोना काळातही महाराष्ट्रातील जनतेला सुरक्षित प्रवासाची सेवा देणाऱ्या एसटी कर्मचारी बांधवांचे मागील तीन महिन्यांचे वेतन थकले.दिवाळी सणात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.दिवाळी बोनस तर सोडाच पण मागील तीन महिन्यांचे पगार सुद्धा एसटी कर्मचारी लोकांना मिळालेले नाहीत.

आम्ही जगायचं कसं?  (एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा)  एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश...
How do we live? (ST workers 'grief) ST workers' outcry ...

आम्ही जगायचं कसं?

(एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा)

एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश...

पुणे पिंपरी : कोरोना काळातही महाराष्ट्रातील जनतेला सुरक्षित प्रवासाची सेवा देणाऱ्या एसटी कर्मचारी बांधवांचे मागील तीन महिन्यांचे वेतन थकले.दिवाळी सणात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.दिवाळी बोनस तर सोडाच पण मागील तीन महिन्यांचे पगार सुद्धा एसटी कर्मचारी लोकांना मिळालेले नाहीत.

अहोरात्र सेवा

महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना छोट्या खेड्यापासून ते मोठ्या शहरापर्यंत जोडणारी एकमेव प्रवाशी सेवा  म्हणजे एसटी. गेल्या अनेक दशकापासून एसटी ने सामाजिक बांधिलकी निर्माण केली आहे.  एसटी ही खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन आहे .विद्यार्थी व वृध्दव्यक्तीना देखील अर्धच तिकीट लागत असल्याने जास्तीत जास्त वृध्द व्यक्ती व विद्यार्थी या एसटीने प्रवास करत असतात. तसेच दिवाळी, दसरा, गणपती, यात्रा, सण आणि इतर दिवशी जास्तीत जास्त प्रवास करण्यासाठी तात्परतेने उपलब्ध असणारी गाडी म्हणजे एसटी च असते.
अशी अहोरात्र सेवा देणाऱ्या कामगार लोकांच्या नशिबी उपासमारीची वेळ आली आहे.

तुटपुंजा पगार

एसटी तिल नोकरी नावालाच सरकारी नोकरी आहे.आज सर्वात कमी पगार एसटी कर्मचाऱ्यांना मिळतो.एसटी कर्मचारी आजही कमी वेतनात दिवसरात्र राबताना दिसत आहे.सध्या एसटीतील चालक-वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांचे सरासरी वेतन १२ ते  १४  हजारच्या जवळपास  एवढे आहे. आज २१ व्या शतकात जीवन जगताना १० ते १२  हजार रुपयामध्ये घर चालवणं सोप नाही. तरी देखील एसटी कर्मचारी कमी वेतनात रात्रंदिवस काम करत असतात.एवढ्या कमी पगारात एसटी हाकणारा संसाराचा गाडा कसा हाकणार?आज एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना ७० ते ८० हजार पगार मिळतो. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांना १० ते १२ हजारावर आपल्या संसाराचा गाडा हाकलावा लागतो. १० ते १२ हजार रुपयांत मुलांचं शिक्षण, किराणा, दवाखाना, घरभाडे, वगैरे..वगैरे हे सर्व गोष्टी आपल्या तुटपुंज्या पगारावर एसटी कर्मचारी भागवत असतात.  

शारीरिक हालअपेष्टा

नियमानुसार ठरवलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करणे, चालकांसाठी असलेल्या खुर्चीच्या गैरसोयीच्या रचनेमुळे मोठ्या प्रमाणावर आजार होतात. सतत फिरतीवर असल्याने नेहमीच घरापासून दूर राहावे लागते.दूर अंतराच्या गाडीने जाणा-या कर्मचाऱ्यांना राहायला ना झोपायची व्यवस्थित गादी, ना चांगले जेवण, ना स्वच्छ टायलेटची सोय,स्वत:च्या घरुन आणलेल्या सतरंज्या असल्या तर ठीक नाहीतर वर्तमानपत्राच्या घडीवर झोपावं लागतं. 

कारवाईची टांगती तलवार

डेपोत भरणा करताना रक्कमेत नजरचुकीने जरी तूट आली की रक्कम स्वत;च्या खिशातून भरावे लागते. नाही भरले तर निलबंन आहेच मग. महामंडळाने दिलेली उद्दिष्टे, वेळेत पोहचणे, केपीटीएल वाढविणे, कमी पगार यासह अनेक कारणांमुळे चालकांना ताणतणाव येतो. यामुळे ओव्हर टाईम करून पगारापेक्षा दोन पैसे वाढवून मिळविण्यासाठी चालक नेहमीच धडपड करीत असतो.अहोरात्र प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या एसटी कर्मचारी बांधवाना तात्काळ त्यांच्या हक्काचे थकीत वेतन देऊन त्यांची दिवाळी गोड करावी.

दिलीप नारायणराव डाळीमकर
मुपो कव्हळा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा

लोहगाव , पुणे

प्रतिनिधी - आत्माराम काळे

__________