श्रीदेवी रुग्णालयाचा परवाना रद्द | Sridevi Hospital license revoked

ज्यादा बिल आकारणाऱ्या श्रीदेवी रुग्णालयाचा परवाना रद्द. पालिकेच्या वतीने रुग्णालयावर प्रशासकाची नियुक्ती  

श्रीदेवी रुग्णालयाचा परवाना रद्द | Sridevi Hospital license revoked
Sridevi hospital's license revoked

ज्यादा बिल आकारणाऱ्या श्रीदेवी रुग्णालयाचा परवाना रद्द

पालिकेच्या वतीने रुग्णालयावर प्रशासकाची नियुक्ती  

कल्याण (Kalyan) : शासनाने निर्धारित केलेल्‍या दरापेक्षा अवाजवी दराने बिलांची आकारणी केल्‍यामुळे तसेच इतर काही आक्षेपार्ह बाबी महापालिकेच्‍या भरारी पथकास आढळून आल्‍याने कल्याण पश्चिमेतील श्रीदेवी रुग्‍णालयाला कारवाई का करण्‍यात येवू नये व त्यांचा महापालिकेच्‍या दप्‍तरी असलेला नोंदणी परवाना का रद्द करु नये, अशी नोटीस श्रीदेवी रुग्‍णालयास यापूर्वीच बजावण्‍यात आली होती. मात्र या नोटीसला समाधानकारक उत्तर न दिल्याने महानगर पालिकेने  श्रीदेवी रूग्णालयाचा परवाना ३१ ऑगस्ट पर्यंत रद्द केला आहे.  

श्रीदेवी रुग्‍णालयाने (shidevi hospital) त्‍यांच्या रुग्‍णालयातील २४ बेडवर जुलै महिन्यापासून कोविड रुग्‍णांवर (covid hospital) उपचार होत असूनही महापालिकेस याबाबत कळविले नव्‍हते. त्याचप्रमाणे महापालिकेने दिलेल्या नोटीसावर रुग्णालयाने केलेला खुलासा पाहीला असता नोटीसीत नमुद बाबींचा खुलासा न करता शासन दरापेक्षा जादा दराने आकारणी केल्याबाबतचे समर्थन केल्याचे दिसून आले.

श्रीदेवी रुग्णालयात शासनाने दिलेल्या दरापेक्षा जादा आकारणी करुन जास्त रक्कमेचे बिल रुग्णाला देणे, ८० टक्के व २० टक्के बेडचे स्वतंत्र नोंद न ठेवणे व रुग्णांस त्याविषयी माहिती न देणे, महापालिकेच्या भरारी पथकास सर्व बिले तपासणीसाठी उपलब्ध करुन न देणे, लेखा परिक्षकांस असहकार्य करणे व उध्दट वर्तन करणे इत्यादी बाबी पाहता सदर रुग्णालयाने शासनाने व महापालिकेने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्यामुळे मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट १९४९ नुसार देण्यात आलेली रुग्णालय नोंदणी दि. ३१  ऑगस्ट २०२०  किंवा उपरोक्त अनियमितता दूर करुन रक्कम परत करणे यापैकी जे नंतर घडेल तोपर्यंत निलंबित करण्याचा आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, यांनी निर्गमित केले आहे.

सदर रुग्णालयामध्ये ओपीडिद्वारे हिमोडायलेसिस (Hemodialysis) करण्यास परवानगी राहील परंतु कोणत्याही प्रकारचे नविन रुग्ण उपचारासाठी दाखल करुन घेण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसेच सदर आदेशाचे पालन करुन घेणे व सदर रुग्णालयात आज रोजी दाखल असलेल्या कोव्हिडग्रस्त (coronavirus) रुग्णांवर शासनाच्या आदेशानुसार समाधानकारक औषधोपचार होईल व त्यांच्याकडून शासकीय दराने बिलाची आकारणी केली जाईल, हे निश्चित करण्याकरीता व रुग्णालयातील सर्व रुग्ण डिसचार्ज होईपर्यंत परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी समिर सरवणकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कल्याण, ठाणे  

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

_______

Also see : कोविड योद्धा एपीएमसी सफाई कामगार विशेष भत्त्यापासून वंचित | Covid warrior APMC cleaners deprived of special allowance

https://www.theganimikava.com/covid-warrior-apmc-cleaners-deprived-of-special-allowance-navi-mumbai