सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाचे घवघवीत यश...

पालघर जिल्ह्यात विधी साक्षरतेचे बीज रोवणाऱ्या सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाचा १००% निकाल.

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाचे घवघवीत यश...
100% result of Sonopant Dandekar Law College sowing the seeds of legal literacy in Palghar district...

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाचे घवघवीत यश...

    पालघर जिल्ह्यातील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि विधी शिक्षणाच्या प्रसारासाठी सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी संस्थेने पुढाकार घेत सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाची स्थापना केली. विधी शिक्षणाची महाविद्यालयात सुरुवात झाल्यानंतर विधी शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी विधी पदवीची ३ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण करत किमया साधली आहे. विद्यार्थ्यांनी १००% यश मिळवून महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. गेल्या ३ वर्षापासून महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करीत आलेले आहे. वर्ग शिक्षणासोबतच प्रात्याक्षिकांवर विशेष भर दिला गेला असून प्रत्यक्ष न्यायालय कामकाज अनुभवणे, विविध न्याय संस्थांना भेटी, पोलीस स्थानक ते मध्यवर्ती कारागृहातील कामकाजाची माहिती, सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, संसद भवन, राष्ट्रपती भवन, विविध आंतरराष्ट्रीय संस्था येथे विशेष अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

      महाविद्यालयाने व्यावसायिक शिक्षण म्हणून खासकरून अभिरूप (मुट कोर्ट) न्यायालय, तज्ञ लोकांची व्याख्याने, विधी सेवा जनजागृती अभियान, मतदार जागृती अभियान, स्वच्छ भारत अभियानासारखे विविध सामाजिक उपक्रम हातात घेऊन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर दिला. मुंबई विद्यापीठाचा विधी शाखेचा निकाल जाहीर झाला असून सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाचा १००% निकाल हा महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक शिरोमणी समाविष्ट झाला आहे. विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशामुळे महाविद्यालयाच्या शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

       शिप्रा भानुशाली हि ७६% गुणांसह प्रथम क्रमांक तर विद्या सावला ह्या विद्यार्थीनीने ७३.५०% घेत दुसरा क्रमांक मिळवला आहे. तर प्रशंशा दळवी हिने ६८.३०% संपादित करीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. महाविद्यालयाचा एकुण निकाल १००%, त्यातील ४७% विद्यार्थी प्रथम वर्गातून उत्तीर्ण झाले आहेत. २९ % विद्यार्थ्यांना व्दितीय श्रेणी प्राप्त झाली आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पायल चोलेरा यांच्या नेतृत्वाखाली प्रो. दिशा तिवारी, उत्कर्षा जुन्नारकर, राधा मित्रा, विनोद गुप्ता, प्रियांका तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादित केले आहे. सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष एड. जी. डी तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत दांडेकर, सचिव प्रो. अशोक ठाकूर, सचिव अतुल दांडेकर, सहसचिव जयंत दांडेकर, खजिनदार हितेंदभाई शाह व विश्वंत मंडळ हे या यशाचे खरे शिल्पकार असून ह्यांच्या संकल्पनेतून विधी महाविद्यालयाचा पाया रोवला गेला, त्याचप्रमाणे वेळोवेळी सहकार्य करणारे कर्मचारी वृंद - भावना इग्राल, समता पाटील, मासुम मोहमदवाला, स्वाती पाटील, चुरी काका व चिराग शेलार या सर्वांची मदत वेळोवेळी विद्यार्थांना मिळाली. सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाचा अभुतपुर्व निकालानंतर सर्वच स्तरातून महाविद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पालघर

प्रतिनिधि : राजेंद्र पाटील

___________