डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणार्या समाजकंटकाना लवकरात लवकर अटक करावी - जिल्हाध्यक्ष किशोर कागदे...
बीड येथे काही जातीवादी माथेफिरु गावगुंडांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणार्या समाजकंटकाना लवकरात लवकर अटक करावी - जिल्हाध्यक्ष किशोर कागदे...
बरदापुर ता.अंबाजोगाई जि. बीड येथे काही जातीवादी माथेफिरु गावगुंडांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली. काही जातीवादी दोन समाजात जातीय तेढ निर्माण करून दंगली घडविण्याचा प्रयत्न करणार्या समाजकंटकास कठोरात कठोर शासन करण्यात यावे त्या संदर्भात बर्दापुर पोलीस स्टेशन चे पी.आय. शिंदे साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) बीड जिल्हाध्यक्ष किशोर कागदे यांनी केली व त्यांनी विटंबना करणाऱ्यास लवकरात लवकर आरोपींस अटक करू असा शब्द दिला.चर्चा करतांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)चे जिल्हाध्यक्ष मा.किशोरजी कागदे,प्रा.सुनील थोरात जि. सचिव,अक्षय भैया कोकाटे शहर अध्यक्ष सुमित ओव्हाळ व इतर रिपाइं कायरकर्ते उपस्थित होते.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
_________