पत्रकार राजेंद्र राऊत यांची अहमदनगर जिल्हा पोलीस मित्र संस्थेच्या श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी निवड...

सुमारे आठ महिन्यांपासून राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) आजी,माजी विद्यार्थी श्रीगोंदा पोलिसांसोबत आहोरात्र काम करत आहेत याच कामाची दखल घेत राजेंद्र राऊत यांची अहमदनगर जिल्हा पोलिस मित्र संस्थेच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याचे पत्र नुकतेच संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत क्षेत्रे यांनी दिले.

पत्रकार राजेंद्र राऊत यांची अहमदनगर जिल्हा पोलीस मित्र संस्थेच्या श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी निवड...
Journalist Rajendra Raut elected as Shrigonda taluka president of Ahmednagar District Police Friends Association ...

पत्रकार राजेंद्र राऊत यांची अहमदनगर जिल्हा पोलीस मित्र संस्थेच्या श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी निवड...

श्रीगोंदा : सुमारे आठ महिन्यांपासून राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) आजी,माजी विद्यार्थी श्रीगोंदा पोलिसांसोबत आहोरात्र काम करत आहेत याच कामाची दखल घेत राजेंद्र राऊत यांची अहमदनगर जिल्हा पोलिस मित्र संस्थेच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याचे पत्र नुकतेच संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत क्षेत्रे यांनी दिले.

यावेळी क्षेत्रे म्हणाले की, कोरोना काळात  शासनाकडून जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कर्जतचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक संजय सातव आणि तत्कालीन श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) आजी आणि माजी विद्यार्थी सुमारे आठ महिन्यांपासून विना मेहताना रात्रीची गस्त करत श्रीगोंदा शहराला सुरक्षा पुरवत आहेत. यापुढेही आपले कार्य असेच चालू राहणार असून पुढील काळात इतर शासकीय कार्यालये, देवस्थाने, संस्था यांना सुरक्षा पुरवण्यासाठी संस्था काम करणार असल्याने श्रीगोंदा तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी पोलीस मित्र संस्थेचे सभासद होवून संस्थेच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन क्षेत्रे यांनी यावेळी केले. 

यावेळी संस्थेचे नगर तालुकाध्यक्ष आकाश निकम तसेच किरण कळसे, सागर डहाळे, प्रथमेश वाळूंजकर, मंगेश होले, अक्षय काळे यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी राऊत यांच्या निवडीबाबत अभिनंदन केले असून तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेछा दिल्या आहेत.

श्रीगोंदा ( शिरसगाव बोडखा )

प्रतिनिधी - आदेश उबाळे 

___________