कल्याण तालुक्यात शिवसेनेचे जास्तीत जास्त सरपंच होणार... | शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांचा विश्वास... 

कल्याण-ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

कल्याण तालुक्यात शिवसेनेचे जास्तीत जास्त सरपंच होणार... |  शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांचा विश्वास... 
Shiv Sena will have maximum Sarpanch in Kalyan taluka ... | Shiv Sena Kalyan district chief Gopal Landage believes ...

कल्याण तालुक्यात शिवसेनेचे जास्तीत जास्त सरपंच होणार... 

शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांचा विश्वास...   

कल्याण : "कल्याण-ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणूका पक्षाच्या चिन्हावर चालत नाहीत. सर्व पक्षाचे उमेदवार निवडणूकीत उभे आहेत. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्याच आघाडीच्या धर्तीवर ग्रामपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूका लढविल्या जात आहे. यापूर्वी सर्व ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच होते. निवडणूकीच्या निकालनंतरही शिवसेनेचे जास्तीत जास्त सरपंच असतील असा दृढ विश्वास शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केला आहे."

कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये खडवली बेहरे, म्हारळ या दोन्ही ग्राम पंचायतीमध्ये १७ जागा आहे. या दोन्ही ठिकाणी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची छूपी आघाडी आहे. कल्याण तालुक्यातील कांबा, खोणी, वडवली ग्रामपंचायत या ठिकाणी महाविकास आघाडी आहे.

कल्याण तालुक्यात एकूण २११ जागा आहेत. यामध्ये ११ सदस्य संख्या असलेली वरप ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली आहे. २११ पैकी ३३ जागांवर बिनविरोध सदस्य निवडणूक आले आहेत. १६७ जागेवर येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या सर्व ग्रामपंचायत मध्ये एकंदरीत पाहिले तर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________