धनंजया...धन्याचे गोडवे गावे किती...शरदाच्या चांदण्यात नहावे किती... 

मुंबई शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ई बार्टी मोबाईल ऐपचे लोकार्पण करण्यात आले.यामध्ये बाबासाहेबांचा फोटो प्रसिद्ध करणे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना लाजिरवाणे वाटले. एवढी मग्रुरी येते कुठून मुंडे जबाब दो काल महाराष्ट्राचे जाणते राजे (काही लोकांच्या परिभाषेतील) शरद गोविंदराव पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था  अर्थात बार्टी च्या मोबाईल अपचे लोकार्पण करण्यात आले.

धनंजया...धन्याचे गोडवे गावे किती...शरदाच्या चांदण्यात नहावे किती... 
Dhananjaya ... How many sweet villages of Dhanya ... How many bathing in the autumn moon ...

धनंजया...धन्याचे गोडवे गावे किती...शरदाच्या चांदण्यात नहावे किती...     

मुंबई शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ई बार्टी मोबाईल ऐपचे लोकार्पण करण्यात आले.यामध्ये बाबासाहेबांचा फोटो प्रसिद्ध करणे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना लाजिरवाणे वाटले. एवढी मग्रुरी येते कुठून मुंडे जबाब दो काल महाराष्ट्राचे जाणते राजे (काही लोकांच्या परिभाषेतील) शरद गोविंदराव पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था  अर्थात बार्टी च्या मोबाईल अपचे लोकार्पण करण्यात आले.

या अपची लोकार्पण जाहिरात समाजमाध्यमांवर झळकली असता सदरील जाहिरातीचा आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.  सदरील अपच्या जाहिरातीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार  आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह स्वतः धनंजय मुंडे यांचा फोटो आहे. आणि शरद पवारांचा फोटो खास शैलीत केलिग्राफी करून प्रसिध्द केला आहे.८ दशके कृतज्ञतेची असा मजकूर प्रसिद्ध केला असून त्यावर शरद पवार यांचा फोटो आहे.

मात्र ज्या महामानवाच्या नावे ही संस्था स्थापन केली आहे आणि ज्या महामानवाच्या विचारप्रणालीवर जे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य हे खाते मागासवर्गीय आणि दुर्बल घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करते त्या महामानवाचा फोटो छापण्याचे धाडस धनंजय मुंडे यांनी दाखवले नाही कीं मुद्दामहून बाबासाहेबांचा फोटो छापला नाही याबद्दल समाजामध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. आम्ही तर म्हणतो या जाहिरातीत शरद पवार उठता बसता चालता बोलता ज्या महामानवांचे नाव घेतात त्या फुले शाहू आंबेडकरांचे त्रयिंचे फोटो छापले असते तर अजून बरे झाले असते.

येनेकेन प्रकारे धनंजय मुंडे यांना बाबासाहेबांची अलेर्जी झालेली आहे असेच वाटते. केवळ शरद पवारांचा उदोउदो करण्याचा हा घाट आहे. बोलताना फुले शाहू आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि सत्तेवर यायचे व सत्तेत बसल्यानंतर यां महामानवांच्या विचारांना हरताळ फासायचा हेच यां कृतीतुन दिसते.

सदरील घटनेचा तीव्र निषेध समाजांमध्ये आणि समाजमाध्यमांवर होत असून अखिल भारतीय मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीन अर्थात एम आय एम विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ कुणाल गौतम खरात यांनी याबाबत समाज माध्यमांवर पोस्ट टाकून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून लवकरात लवकर ते याबाबचे निवेदन ऑनलाईन सर्व संबंधितांना पाठवून खुलासा मागणार आहेत.... शेवटी असे म्हणावे वाटते कीं धनंजया...धन्याचे गोडवे गावे किती...शरदाच्या चांदण्यात नहावे किती...

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

___________