परळीकरांची समस्या... | नमस्कार मी शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल बोलतोय...

आज माझी अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे.ज्या वेळेस मी निर्माण अवस्थेत होतो त्यावेळेस मला खूपच आनंद व उत्साह वाटत होता,कारण माझ्या येण्यामूळे परळी शहराच्या सौंदर्यात भर पडणार होती व लोकांचा प्रवासाचा वेळ वाचणार होता. 

परळीकरांची समस्या... | नमस्कार मी शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल बोलतोय...
Parlikar's problem ... | Hello, I am talking about Shamaprasad Mukherjee Railway Flyover ...
परळीकरांची समस्या... | नमस्कार मी शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल बोलतोय...

परळीकरांची समस्या...

नमस्कार मी शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल बोलतोय...

परळी दि. १७ : आज माझी अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे.ज्या वेळेस मी निर्माण अवस्थेत होतो त्यावेळेस मला खूपच आनंद व उत्साह वाटत होता,कारण माझ्या येण्यामूळे परळी शहराच्या सौंदर्यात भर पडणार होती व लोकांचा प्रवासाचा वेळ वाचणार होता. 

आज माझी अवस्था या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीनी,शासनाच्या सबंधित अधिकाऱ्यांनी व बोगसकामे करून घर भरणाऱ्यागुत्तेदारांनीखुपच बिकट करूण
 ठेवलीय.माझ्याच नावावर अनेकजण गलेलठ्ठ झालेत पण माझी व जनतेची परिस्थीती मरणासन्न अशी करून ठेवली आहे. मला आठवत सुध्दा नाही माझे निर्माण झाल्यापासुन ते कसले स्ट्रेक्चर आँडिट झाल्याचे ,वाईट वाटते माझ्यासमोरच अनेक तरूणयुवकांचा अपघातामुळे जीव गेला आजही नागरीक जीव मुठीत घेऊन मजवरून प्रवास करतात माझ्या अंगावर असलेल्या धुळीमूळे माझा जीव दररोज गुदमरतोय.

मी अजूनही जनतेची सेवा करण्यास तयार आहे. मी कोणत्या विभागाच्या अखत्यारित येतो हे नां परळी नगरपरिषद सांगते नां सार्वजनिक बांधकाम विभाग न राष्ट्रीय महामार्ग विभाग,मागे परळी नगरपरिषदेने इटके कार्नर ते मौलाना अब्दुल कलाम आझाद चौकापर्यंतचा मुख्य रोड आपल्या ताब्यात घेतला मात्र माझ्या दुरूस्तीकडे पाठ फिरवली नंतर लवकरच माझ्या बाजुला माझा भाऊबंद उभा राहणार हि बातमी माझ्या कानी आली व त्याच्या उभारणीचा सर्वे झालेला व त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे आर्थिक नियोजन झाले याचा मी साक्षीदार झालो.

यापुढे माझ्यावरील  होणाऱ्या बेशुमार वाहतुकीचा भार कमी होणार म्हणुन मी आंनदीत झालो मात्र हाआनंद क्षणभंगुर ठरला व हे होणारे काम राजकिय गुलदस्त्यात गुढांळले गेले व पुढे जेंव्हा राष्ट्रीयमहामार्गाच्या रोडचे काम होईल तेंव्हा माझ्या बाजुला दुसरा उड्डाणपुलाचे काम 2022च्या दरम्यान  होईल असे मला कानोकानी समजले ,ते व्हावे नसता मागचे पाढे पंच्चावन असे नको व्हायला असे मला वाटते.

शासनप्रशासनाच्या विविध विभागातील अधिकारी, लोकप्रतिनीधी हे आपल्या कुटुंबासह माझ्या छातीवरून दिवस,रात्र प्रवास करतात मी यांच्या विषयी वाईट व्हावे हे इच्छीत नाही मला यांची काळजी वाटते माझ्या समोर कोणाचाही मृत्यू होऊ नये असे मला प्रामाणिकपणे वाटते मात्र हे मी रोखु शकत नाही कारण माझी अवस्था शरपंजरीवर असलेल्या व इच्छाशक्ति मरणाचे वरदान मिळालेल्या भिष्माचार्या सारखी असुन हे परळीकरांनो आपणच आपल्या लोकप्रनिधी,शासनदरबारी जनरेटा वाढवुन   कृपया मला धुळीतून,खड्ड्यांमधून व अवैध वाहतूकीतून मुक्त करा ही नम्र विनंती.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

___________